इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी 

      पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केले आहे.

   जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज मात्र शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्ज मागणीसाठी 30 सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी 30 सप्टेंबर 20 20 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत.जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्यामार्फत बँकेला दिलेल्या आहे व पात्र शेतकऱ्यांची अर्ज संबंधित बँकेकडे प्रलंबित आहेत अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्ज व शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपाची कार्यवाही जलदगतीने करावी असे आदेश बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या