पोस्ट्स

नवनिर्वाचित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी

इमेज
  परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिके च्या महिला व बालकल्याण सभापतीपदी परळी/प्रतिनिधी परळीची भूमिकन्या असलेल्या अपर्णा ऋषिकेश नेरलकर यांची नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. अपर्णा नेरलकर या नांदेडमधील भाग्यनगर प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. तर अ. भा. नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्याही अध्यक्षा आहेत. परळीतील विठ्ठल मंदिराशेजारचे श्री. अंबादासराव देशपांडे यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत. नांदेड महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. पालिकेवर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. महापालिकेत महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसमधील अनेक नगरसेविकांनी मोर्चेबांधणी केली होती. अखेर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरसेविका म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन नेतृत्वाची चुणूक आपल्या कामकाजातून दाखवणाऱ्या अपर्णा नेरलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नांदेडमध्ये नेरलकर घराणे व्यवसायातले बडे प्रस्थ असून राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हा...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार परळी वैजनाथ दि. 21..        नागापुर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सत्कार केला. यावेळी मिळालेला विजय हा सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. ही विजयी घोडदौड आगामी सर्वच निवडणूकांत कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.       यशश्री निवासस्थानी आज पंकजाताई मुंडे यांनी नागापूर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर विजय नक्कीच मिळतो. म्हणून आगामी प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे यश नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करून सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले. विजयी उमेदवारांमध्ये अशोक ज्ञानोबा मुंडे, दिपक विश्वनाथ सोळंके, नागोराव तुकाराम सोळंके, परमेश्वर मोतीराम सोळंके, राहुल मदनराव सोळंके, रत्नमाला रामराव सोळंके, आत्माराम संभाजी मुंडे यांचा समावेश आहे. ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!