पोस्ट्स

निधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे

इमेज
  सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे  धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण धनंजय मुंडे यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो कार्यकर्त्यांची गर्दी;आईंनी केलं औक्षण तर प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन परळी (दि. 15) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यात हजारो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे फोटो पाठवले आहेत.   2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बो

MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

इमेज
  अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा बीड । दि. ०१ । केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरि

MB NEWS-परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण

इमेज
 *परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण* * पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे* परळी (दि. 11) - परळी नगर परिषदेच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार असून, एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज परळीतील जगमित्र कार्यालयात वितरण करण्यात आले.  सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 423 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यांपैकी 170 लाभार्थींना आज झालेल्या कार्यक्रमात पहिल्या हफत्याचे वितरण करण्यात आले तर उर्वरित घरकुलांच्या पहिल्या हफत्याची रक्कमही लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते अजयजी मुंडे, डॉ. मधुक