शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे

शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे • *_कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे वसंतराव नाईक जयंती साजरी_* • सोनपेठ (प्रतिनिधी)..... कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंती यांची जयंती साजरी करण्यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, सरपंच रामप्रसाद यादव, पोलीस पाटील वैजनाथराव यादव, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे,वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रातील खर्या अर्थाने क्रांती घडवून शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हण...