पोस्ट्स

धनंजय मुंडे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा

इमेज
 काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा * मोठ्या उत्साहात परळीकरांचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी* *धनंजय मुंडे यांनी भाजपसह विविध पक्षाच्या पेंडॉल मध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा* *धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केले अभिवादन* परळी (दि. 06) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला. श्री. मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिर परिसरात येणाऱ्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता. परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.  भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या प
इमेज
 *आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते रविवारी हनुमान नगर येथील श्री.कृष्णमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलाशारोहण सोहळा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         शहरातील हनुमान नगर, डोंगर तुकाई रोड भागात उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे.              श्री कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण चौक, हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे रविवार दि. २१/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गुरु कांंच बसवेश्वर मठ संस्थान, पाथरीचे श्री.ष.ब्र.१०८ गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री. ह. भ. प. गणेश महाराज जाधव परतुरकर, ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. शिवहरी महाराज भाकरे कृष्ण नगर, अंबलवाडी यांचे आशिर्वचन लाभणार आहेत.पुजा विधी पौरोहित्य श्री. उमाकांत स्वामी हे करणार आहेत. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून न. प.. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगराध्यक्ष

MB NEWS-सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे

इमेज
  सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे  धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण धनंजय मुंडे यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो कार्यकर्त्यांची गर्दी;आईंनी केलं औक्षण तर प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन परळी (दि. 15) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यात हजारो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे फोटो पाठवले आहेत.   2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बो

MB NEWS- मोहन साखरे यांचा लेख>>>> माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

इमेज
 माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!        महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार राज्याचे  माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!         महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे आ.धनंजय मुंडे हे आहेत. आ.धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अ

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

इमेज
  वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे                राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती.              ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली . आरोग्य विभागात काम करत आसताना अनेक वेळा  बीड जिल्ह्यातील पेशंट हाँस्पिटलला येत होते. अनेक पेशंट ची आर्थिक प

MB NEWS-विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा

इमेज
  विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा  मुंबई : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.       क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे  शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. 'शिंदेशाही' सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे. क्लिक करा:  'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. तगडा अभ्यास आणि प्रशासनाकडून कामे क

MB NEWS-'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट

इमेज
  'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट    मुंबई......       राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात फाईलचा ढिग पडल्या बाबतचा एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला.याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत वास्तविकता सांगितली आहे. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे*        आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,"सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या मंत्री कार्यालयातील सर्व नस्त्या जमा करून उर्वरित रद्दी नष्ट करून कार्यालय रिकामे करून देण्याचा प्रघात आहे. कार्यालयीन कर्मचारी रद्दी नष्ट करण्यासाठी संकलन करत असताना कुणीतरी खोडसाळपणाने एक व्हीडिओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे समजले. चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पसरवल्या जात असलेल्या त्या व्हीडिओवर कृपया दुर्लक्ष करावे व प्रसिद्धी देऊ नये, ही नम्र विनंती." 🔵  हे देखील वाचा पहा  क्लिक करा: *एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स

MB NEWS-दगदगीमुळे अशक्तपणा आहे:धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे

इमेज
  दगदगीमुळे अशक्तपणा आहे: धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे मुंबई-       दगदगीमुळे अशक्तपणा आला आहे.उपचार सुरू आहेत.धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.ते उद्या पर्यंत रिकव्हर होतील  अशी माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजप नेत्या पंकजा मुंडे  या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यंनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भोवळ आली होती, विकनेस आला होता, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहोत, आम्ही त्यांना भेटलो, ते उद्यापर्यंत रिकव्हर होतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  संबंधित बातम्या Click:*प्रकृती स्थिर-विश्

MB NEWS-पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

इमेज
  पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला मुंबई, प्रतिनिधी.....     आपले भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर *खा. सौ. सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.    धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.त्याचब

MB NEWS-*धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*

इमेज
 *दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली,  डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* *अजितदादांनी मुंडेंची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; भोवळ आल्याने धनंजय मुंडे यांची प्रकृती अस्थिर झाली होती - अजितदादा पवार* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट* मुंबई (दि. 13) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे.  आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या

MB NEWS-प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार

इमेज
  प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार   मुंबई :  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड,परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे  यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असुन त्यांना पुढील आठ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.         सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना छातीत किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले. ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटत होते. ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये डॉ समदानी यांनी तपासणी केली. त्‍यांच्यावर उपचार सुरु असून आता त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. आणि डॉक्टरांनी आठ दिवसाचा विश्रांतीचा सल्ला दिला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

MB NEWS- परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा

इमेज
  परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून 2.77 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान _परळी (दि. 09) - परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हा स्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता बहुजन कल्याण विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे._ Click:पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे बहुजन कल्याण विभागाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून सुमारे 44 गावांतील विविध कामांना 2 कोटी 77 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. Click:बीड व परभणीत फरक करणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2021-22 अंतर्गत परळी मतदारसंघातील कामांची यादी सेलुुतांडा सौर पथदिवे बसवणे, नागपिंपरी-घाटशिळ तांडा पाईपलाईन 5 लक्ष, नागपिंपरी-घाटशिळ तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौनापूर -तळ तांडा सौरपथदिवे 3 लक्ष, गोवर्धन-नाईक नगर तांडा पाईपलाईन 5 लक्ष, गोवर्धन-नाई

MB NEWS-परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण

इमेज
 *परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण* * पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे* परळी (दि. 11) - परळी नगर परिषदेच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार असून, एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज परळीतील जगमित्र कार्यालयात वितरण करण्यात आले.  सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 423 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यांपैकी 170 लाभार्थींना आज झालेल्या कार्यक्रमात पहिल्या हफत्याचे वितरण करण्यात आले तर उर्वरित घरकुलांच्या पहिल्या हफत्याची रक्कमही लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते अजयजी मुंडे, डॉ. मधुक

MB NEWS-डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी

इमेज
  डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन राशन कार्डबाबतची सर्व कामे सुलभ पद्धतीने करुन देऊ- नम्रता चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आज शुक्रवार, दि.25 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते  उद्घाटन झाले.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तहसील मधील राशनकार्ड पद्धत सुलभ करून देण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी दिले.     फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व त

MB NEWS-धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....!

इमेज
  धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....! लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...           दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झाली.  या नोंदणीचे प्रमाणपत्र आज ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. या प्रसंगाचे वर्णन करताना ना. धनंजय मुंडे यांनी आणखी एक आनंदाचा दिवस अशा शब्दात वर्णन केले आहे.      Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*        याबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रमाणपत्र स्वीकारत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.तसेच हा दिवस आपल्या साठी एक आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,"आणखी एक आनंदाचा दिवस... आज स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कंपनी कायद्यांतर्गत न