पोस्ट्स

सप्टेंबर ६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:राज्यात सव्वा सात लाख रुग्ण कोरोनामुक्त* *एका दिवसात झाल्या ९२ हजार पेक्षा जास्त कोरोना चाचण्या* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*

इमेज
 *राज्यात सव्वा सात लाख रुग्ण कोरोनामुक्त* *एका दिवसात झाल्या ९२ हजार पेक्षा जास्त कोरोना चाचण्या* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*           मुंबई, दि.१२: राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ टक्के आहे. आज  दिवसभरात १३ हजार ४८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून  २२ हजार ८४ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ७९ हजार ७६८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.   *आज निदान झालेले २२,०८४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)* : मुंबई मनपा-२३५० (४२), ठाणे- ३९२ (४), ठाणे मनपा-४४० (२), नवी  मुंबई मनपा-४१४ (७), कल्याण डोंबिवली मनपा-४९४ (१), उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-४४ (१), मीरा भाईंदर मनपा-२३४ (१), पालघर-२६९ (४), वसई-विरार मनपा-२९४ (५), रायगड-६७५ (९), पनवेल मनपा-२९४ (१), नाशिक-४१७ (७), नाशिक मनपा-११७४ (३), मालेगाव मनपा-४४, अहमदनगर-५१७ (१४),अहमदनगर मनपा-९७ (३), धुळे-११२ (३), धुळे मनपा-५१ (२), जळगाव- ३९६ (६), जळग

MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्.... जिल्ह्यात एकूण १०२ तर परळीत एकूण ३६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्.... जिल्ह्यात एकूण १०२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह तर परळीत आज ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह अॅन्टिजेन टेस्ट मोहिमे व्यतिरिक्त आकडेवारी अॅन्टिजेन टेस्ट मोहिमेत  परळीत ३० रिपोर्ट पाॅझिटिव्ह परळीतील आजची  पाॅझिटिव्ह एकूण संख्या ३६

MB NEWS:उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक

 *⭕उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक⭕*   मुंबई : 'मातोश्री' उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. पलाश बोसने मातोश्रीसह गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन केले. राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती एटीएसने दिली आहे. मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी 'मातोश्री' हे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन गेल्या आठवड्यात मातोश्रीवर आला होता. त्यावेळी दाऊदचा हस्तक असल्याचा दावा फोन करणाऱ्यानं केला होता. तसंच हा फोन दुबईहून आल्याचा दावा केला जात होता.        एटीएसने याप्रकरणी तपास केला असता हा फोन दुबईहून नव्हे तर कोलकात्याहून केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला कोलकात्यातल्या टोलेगंज भागातून अटक करण्यात आली आहे. अटक करणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. याच व्यक्तीने 'मातोश्री'सह गृहमंत्री अनिल देशमुख आ

MB NEWS:व्याजदाराचे अमिष दाखवून एक कोटी 28 लाखांची फसवणूक; तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल

इमेज
 व्याजदाराचे अमिष दाखवून एक कोटी 28 लाखांची फसवणूक; तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- औरंगाबाद येथील अरुण हरीहर मुळे यांना परळी शहरातील एका पतसंस्थेने ज्यादा व्याजदाराचे अमिष दाखवुन ठेवीच्या रक्कमा मुदत संपुनही परत न देता 1,28,66,699 रु.चा अपहार केल्याची घटना घडली आहे. परळी शहर पोलिस ठाण्यात तिन जणांविरुध्द फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नामांकित मल्टीस्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटीने संगणमत करुन तक्रारदार व इतर ठेवीदार यांना ज्यादा व्याजदाराचे अमिष दाखवुन ठेवीच्या रक्कमा मुदत संपुनही परत न देता 1, 28,66, 699 रुपंयाचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अरुण हरीहर मुळे यांच्या फिर्यादीवरुन औम नारायण जैस्वाल, संगिता ओम नारायण जैस्वाल रा.परळी वैजनाथ, विष्णु रामचंद्र भगवत रा.नाशिक यांच्या विरुध्द दि.11 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता गुरन 273/2020 कलम 420, 406, 409, 34 भादवी सह कलम 3 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय अस्थापना मधील) हीतसंबंधाचे संरक्षण कारणे बाबत अधिनीयम 1999 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MB NEWS:“आरोग्य सेवा अधिनियम करण्याची गरज "-डॉ. अभय शुक्ला

इमेज
 “आरोग्य सेवा अधिनियम करण्याची गरज "-डॉ. अभय शुक्ला   अंबाजोगाई (प्रतिनिधी) डॉ द्वारकादास लोहिया यांच्या स्मृती दिन निमित्ताने मानवलोक संस्थेमध्ये  कार्यवाह श्री अनिकेत लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर व्याख्यानमाला शृंखला आयोजित करण्यात येत आहे. दि. 12.09.2020 रोजी मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे डॉ द्वारकादास लोहिया व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. अभय शुक्ला, सहसमन्वयक जनस्वास्थ्य अभियान यांनी  "कोरोना संकटाच्या काळात तरुणांचा सहभाग : आरोग्य सेवेतील बदल व कृतिकार्यक्रम" या विषयावर मार्गदर्शन केले.  डॉ अभय शुक्ला पुढे म्हणाले कि पाश्चिमात्य देशामध्ये ८८३ डॉलर प्रती व्यक्ती आरोग्यावर खर्च करतात. श्रीलंका ७० डॉलर प्रत्येक व्यक्ती खर्च करते. तर भारतात १९ डॉलर प्रती व्यक्ती खर्च केला जातो म्हणून भारतीय आरोग्य सेवेमध्ये आधुनिक आणि मोठे बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुढे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कि शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांचा अभाव, सेवा सुविधांची कमतरता असल्याने शासकीय रुग्णालयात लोक न जाता खाजगी रुग्णालयाकडे

MB NEWS:14 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर* *_जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन_

इमेज
 *14 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर* *_जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन_ * अंबाजोगाई (प्रतिनिधी)  अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर सोमवार,दि.14 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आले आहे.तरी या शिबीरात बीड जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी झुम अॅप (zoom app) च्या माध्यमातून या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे. बीड जिल्हा काँग्रेसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख,आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंड

MB NEWS:अरे बापरे! लॉकडाउनमुळे नागरीकांनी ‘पीएफ’मधून तब्बल एवढ्या कोटींची केली उचल

इमेज
-----------------------------------  *◼️अरे बापरे! लॉकडाउनमुळे नागरीकांनी ‘पीएफ’मधून तब्बल एवढ्या कोटींची केली उचल* -----------------------------------  मुंबई - लॉकडाउनमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना घर चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे या कालावधीत भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ईपीएफओ’ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी मंडळाने गेल्या पाच महिन्यांत ३५ हजार ४४५ कोटी रुपयांची प्रकरणे निकालात काढली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पाच महिन्यांत ३२ टक्के अधिक अर्ज निकाली काढण्यात आले; तर निधी वाटपाच्या रकमेत १३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत ९४.४१ लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून पैसे काढण्यासाठी अर्ज केले. या दाव्यापोटी भविष्य निर्वाह मंडळाने ३५ हजार ४४५ कोटी रुपयांचे वितरण केले. कोरोनामुळे कार्यालयात उपस्थिती कमी असताना, कामगार मंत्रालयाने विक्रमी वेळेत हे दावे निकालात काढले. कोरोनासंदर्भातील दाव्यांचा जलद गतीने निपटारा केला. भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी ५५ टक्के कोरोना ॲडव्हान्

MB NEWS:नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत

इमेज
 नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत  परळी, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यात दिवसांन दिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या मुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नागरिकांनी विनाकारण, विना मस्क घराबाहेर पडू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सकारत्मक प्रयत्नाने कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन भाजपा जेष्ठ नेते तथा उद्योजक प्रकाश सामत यांनी केले आहे.             परळी शहरातील कोरोना बाधितांची संख्या गंभीर स्थितीत पोहचली असतानाही अनेक जण शहरात विनाकारण, विनामास्क  फिरत आहेत. त्यांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन कोरोना पासून बचाव करावा गर्दीच्या ठिकणी जाणे टाळावे, सोशल डिस्टर्सिंगचे काटेकोर पालन करावे.          शहरातील सर्व फेरीवाले विक्रेते, व्यापारी वर्गानेही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन ग्राहकांनाही सुरक्षित ठेवावे सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा प्रशासन कोरोना विरुद्ध मोठ्या प्रमाणात लढा देत आहे. परंतु नागरिकांनी सुद्धा स्वतःहून यात सकारत्मक सहभाग घेतल्या शिवाय प्रशासनाचे सर्व प्रयत्न अपुरे ठरत असून त्यामुळे कोरो

MB NEWS:राज्यात २१ सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट

इमेज
-----------------------------------  *🛑राज्यात २१ सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट* -----------------------------------  यवतमाळ – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत केंद्राने नुकतेच निर्देश दिले. त्याबाबतची एसओपीही(स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर करण्यात आली. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या बघता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली. दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घ्यावी अशी मागणी केली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: *आज 91 करोना पेशंट घरी जाणार* परळीतील १५ रुग्णांना होणार सुट्टी

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: *आज 91 करोना पेशंट घरी जाणार*  परळीतील १५ रुग्णांना होणार सुट्टी बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: *आज 91 करोना पेशंट घरी जाणार*  परळीतील १५ रुग्णांना होणार सुट्टी

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्; एकूण १५६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. परळीत आजच्या अहवालानंतर २४ रुग्णांची भर

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्; एकूण १५६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. परळीत आजच्या अहवालानंतर २४ रुग्णांची भर

MB NEWS:मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही* *सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

इमेज
*मराठा समाजाच्या विविध संघटनांनाही विश्वासात घेऊन संवाद* *मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही* *सर्वांना विश्वास घेऊन ही  न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* -------------------- *मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये* मुंबई दि ११: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम  कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) संवाद साधला व त्यांच्या या न्याय

MB NEWS:*जिल्ह्यातील ४ शहरांसह मोठ्या ४० गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

इमेज
 *जिल्ह्यातील ४ शहरांसह मोठ्या ४० गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी व कंटेनमेंट झोनमधील नागरिक यांची होणार तपासणी* *दिनांक 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत होणार अभियानाची अंबलबजावणी* बीड,  दि. ११::--जिल्ह्यातील पाटोदा , शिरूर कासार, धारूर वडवणी या ४ शहरात व सर्व तालुक्यातील लोकसंख्येने मोठा असलेल्या ४० गावात कोरोना संसर्ग ( covid-19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे, याबाबत कार्यवाहीचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत  सदर अभियान या ४ शहरांमध्ये व ४० गावांमध्ये 14 ते 16 सप्टेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील बीड,

MB NEWS:सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, कोराना योध्दाचा सन्मान, मास्क, सॅनिटायझरचे वाटप*

इमेज
भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त कोराना यौध्दांचा सत्कार व मास्क सॅनिटायझरचे वाटप* सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, कोराना योध्दाचा सन्मान, मास्क, सॅनिटायझरचे वाटप*  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोहितासाठी सर्व सामान्याचे महामारीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वच कोराना योध्दे म्हणून लढत अशा कोरोना काळात आहोरात्र सेवा देणार्‍यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान व मास्क सॅनिटायझरचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपत साध्यापध्दतीने  व सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.                     देशासह संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. व त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थती निर्माण झालेली आहे. तथापि कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोहितासाठी व सर्वसामान्यांचे महामारी पासुन संरक्षण करण्यासाठी सर्वच कोरोना योध

MB NEWS:अंतिम वर्षाच्या परीक्षा: विद्यार्थ्यांनी आँनलाईन, आँफलाईन चा पर्याय लवकरात लवकर निवडावा.. प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर

इमेज
 बीए,बीकाँम, बीएस्सी अंतिम वर्षाची परिक्षा १ आँक्टोबर पासून.* *अंतिम वर्षाच्या परीक्षा: विद्यार्थ्यांनी आँनलाईन, आँफलाईन चा पर्याय लवकरात लवकर निवडावा.. प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर* *परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          यंदा कोविड विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मार्च ,एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व परिक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे बंधनकारक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला योग्य तो पर्याय निवडावा असे आवाहन लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. परळीकर यांनी केले आहे.                    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० मध्ये होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परिक्षा व इतर सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांना याचा संसर्ग होवू नये म्हणून ही परिक्ष

MB NEWS:रविवार दि.१३ रोजी परळी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय - माऊली फड*

इमेज
 *रविवार दि.१३ रोजी परळी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय - माऊली फड* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.११ - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता परळी व्यापारी महासंघ पुढे सरसावला आहे.विविध व्यापारी महासंघाच्या आज छोटाखानी झालेल्या बैठकीत येत्या रविवारी म्हणजेच दि.१३ रोजी शहरातील मेडीकल दुकाने वगळता सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. परळीतील व्यापारी महासंघाच्या वतीने रविवार दि.१३ रोजी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.हा बंद फक्त एकच दिवस असून शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापले दुकाने बंद ठेवावेत असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्या वतीने करण्यात आले आहे.एक दिवस पूर्ण व्यापार बंद ठेवल्याने कोरोनाची साखळी काही प्रमाणात तोडण्यात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला सहकार्य होईल असेही ते म्हणाले आहेत.

MB NEWS:भाजप युवानेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले अभिष्टचिंतन !

इमेज
  भाजप युवानेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले अभिष्टचिंतन ! हरिसुख प्रतिष्ठान चे अध्यक्ष भाजप युवानेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी यांनी सत्कार करुन अभिष्टचिंतन केले.  राजेश गित्ते यांचा वाढदिवस भा.ज.पा.जिल्हा आध्यक्ष  निळकंट यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी निळकंठ चाटे यांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS:धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या

इमेज
  🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या* -----------------------------------  बार्शी : अनेक व्यवसाय करुनही अपयश आल्याने नैराश्येतून डॉक्टरपतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना पाटील प्लॉट बार्शी येथे  गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विनायक पुरुषोत्तम वरळे (वय ४०, रा. सांगली) मयताचे नाव आहे.  याबाबत शहर पोलिसांत केदार पवार यांनी खबर दिली असून, घटनास्थळी पोलीस मारकड यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीची पत्नी सांगली येथे डॉक्टर आहे. त्याचे वडीलही बार्शीत राहतात. ते इन्कमटॅक्स आॅफिसमधून निवृत्त आहेत.  मयत हा त्यांच्यापासून वेगळ्या प्लॉटमध्ये राहत होता. व्यवसायातील अपयश आणि पत्नी सांगलीला डॉक्टर आहे. ती आपल्याकडे परत येण्यासाठी आग्रह धरत होती. या साºया प्रकारामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस विलास मारकड हे करत आहेत.

MB NEWS:*तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी

इमेज
*तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी* -----------------------------------  कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दुर्मीळ खजिन्यावर मंदिराच्याच धार्मिक व्यवस्थापकाने हात साफ केला आहे. विविध राजे आणि राजवाड्यांकडून दिलेली 71 पुरातन आणि दुर्मीळ नाणी तसेच देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच गायब केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडीवर अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या श्रद्धेने भाविक तुळजापूर येतात. तुळजाभवानीच्या मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच तडा गेला आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि त्यांचे विधिज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी केल्या होत्या. 14 फेब्रुवारी 1980 ते 5 मार्च

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : परिस्थिती चिंताजनकच !

इमेज
 • बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : परिस्थिती चिंताजनकच ! • जिल्ह्यात आज एकूण ११० रिपोर्ट पाॅझिटिव्ह तर परळीत १८ पाझिटिव्ह • परळीतील १८ पाॅझिटिव्ह पैकी नवीन १३ रुग्ण तर ५ सहवासित • बीड जिल्हा : आज 110 पॉझिटिव्ह तर 640 निगेटिव्ह* • बीड 20, अंबाजोगाई 24, आष्टी 2, धारूर 9, गेवराई 6, केज 3, माजलगाव 14 , परळी 18, पाटोदा 4, शिरूर 5, वडवणी  5 रुग्ण

MB NEWS:तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश*

इमेज
-----------------------------------  *◼️तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश* -----------------------------------  मुंबई : नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता. कोरोनाबाधित असल्याने बरे झाल्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे.  तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.  तुकाराम मुंढे यांना आता कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही. त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उ

MB NEWS:अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याचे प्रकरण ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोरील उपोषण लेखी अश्वासनानंतर मागे*

इमेज
 *अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याचे प्रकरण ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोरील उपोषण लेखी अश्वासनानंतर मागे* परळी वैजनाथ - (प्रतिनिधी)        अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून नंदकिशोर चिखले यांनी परळी न.प. समोर अमरण उपोषण सुरू केले होते. लेखी अश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.     नंदकिशोर चिखले यांनी परळी नगर परिषद कार्यालया समोर दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी पासुन कुटुंबासह अमरण उपोषण सुरू केले होते. नगर परिषद प्र.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर, संतोष रोडे आदी अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.प्रशासकीय योग्य ती कार्यवाही तातडीने करु असे लेखी अश्वासन दिले.या अश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

MB NEWS:राहुलच्या शिक्षणास मिळाला आधार माणुसकीचा

इमेज
 राहुलच्या शिक्षणास मिळाला आधार माणुसकीचा ..............................       अंबाजोगाई ( प्रतिनिधी )  अंबाजोगाई तालुक्यातील डॉगर पट्यात वसलेल्या छोट्याशा मंगईवाडी या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील राहुल रामदास शिंदे या विध्यार्थीने परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी मध्ये 92% गुण घेऊन केंद्रात प्रथम आला.            राहूलला पुढे विज्ञान शाखेतुन वैद्यकीय अभ्यासक्रमाची तयारी करण्याची  तीव्र इच्छा , परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण कसे करावयाचे या चिंतेत राहूलचे कुटुंबिय होते.                राहुलला गुणवत्ता पूर्वक शिक्षण मिळण्यासाठी  प्रयत्न करणारे   "आधार माणुसकीचा " उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी सिनर्जी नॅशनल स्कूलच्या संचालक मंडळासमोर राहुलच्या कुटुंबाच्या परिस्थिती माहिती सांगितली  असता ,स्कूलच्या संचालक मंडळाने सामाजिक दाईत्व जोपासत इयत्ता 11/12 वी विज्ञान-नीट व स्कूलबस सह पुर्ण शिक्षण विनाशुल्क करण्याचा निर्णय घेतला,या अनुषंगाने राहुलचे 11 वी विज्ञान शाखेत बुधवारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, प्रवेश प्रसंगी सिनर्जी स्कूलच्या प्राचार्या

MB NEWS:मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा

इमेज
-----------------------------------  *◼️मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा* -----------------------------------  नाशिक, 10 सप्टेंबर : मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

MB NEWS:परळीत बँण्ड असोसिएशन चे शासकीय मदत मिळावी म्हणून तहसीलदारांना निवेदन*

इमेज
  *परळीत बँण्ड असोसिएशन चे शासकीय मदत मिळावी म्हणून तहसीलदारांना निवेदन* परळी (प्रतिनिधी) - : सध्या कोरोनाने थैमान घातलेला असून संपूर्ण देश हा महामारी च्या विळख्यात सापडला आहे कोरोना ने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये अनेक धंद्यावर याचा वाईट परिणाम झाला आहे व तसेच परळी तालुक्यातील बँण्ड  वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्वांची उपजीविका बँण्ड वरच अवलंबून असून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, जयंती मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम, व तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे या कलाकारांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे यामुळे परळीतील बँण्ड असोसिएशन च्या वतीने परळी तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी परळी तालुका बँण्ड असोशियन चे अध्यक्ष बंडू कांबळे, उपाध्यक्ष धम्मा रोडे, कोषाध्यक्ष अभिजीत ताटे, सचिव अरुण वाघमारे, सल्लागार बाबू अवचारे, बाळू मस्के, यशपाल वाघमारे, दीपक अवचारे, महारुद्र पाचांगे, विश्वनाथ चौरे ,संदीप मुंडे, रवी कांबळे, कृष्णा चौरे, जतीन जगतकर, योगीराज चौरे सदस्य बबन रोडे, गणेश गायकवाड, बाळू रोडे, अवि

MB NEWS:ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे - साखर संघ दरम्यान बैठक कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय - पंकजाताई मुंडे

इमेज
  ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे - साखर संघ दरम्यान बैठक कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय - पंकजाताई मुंडे कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा ! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे - साखर संघ दरम्यान बैठक कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय - पंकजाताई मुंडे कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा ! मुंबई दि. १० ------  ऊसतोड कामगारांना मी न्याय मिळवून देणारच आहे, तोपर्यंत कोयता म्यान ठेवावा. माझ्यासाठी ऊसतोड मजूर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, राजकारणाचा नाही असे स्पष्ट करत कामगारांना वेठीस धरून  राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ऊसतोड कामगार लवादाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या दरम्यान आज साखर भवन येथे एक बैठक पार पडली

MB NEWS:भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार* *ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना जाहीर*

इमेज
 *भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार*  *ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं.  बोराडे यांना जाहीर* अंबाजोगाई - यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी  दिला जाणारा राज्य पातळीवरील या वर्षीचा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब उर्फ रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अंबाजोगाईच्या राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, लोककला, सांस्कृतीक चळवळ, पत्रकारिता, सहकार शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान देऊन अंबाजोगाईच्या इतिहासात आपले सुवर्णपान लिहिले असे भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार २०१३ या वर्षी पासून सुरू केला. सुसंस्कृत राजकारणी. साहित्यिक, संगीत गायक व रचनाकार, पत्रकार, नाट्य व चित्रपट अभिनय, सहकार, क्रीडा या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीस महाराष्ट्र पातळीवर हा  पुरस्कार दिला जातो. यापूर्वी यशवंतराव गडाख-पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना.धों. महानोर, रामदास फुटाणे, पं नाथराव नेरळकर, विजय कोलते व मधुकर भावे य

MB NEWS:बीडी उत्पादनावरले संत तुकारामाचे महाराजांचे दिलेले नाव हटवण्याची लेखी मागणी* *महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडावाडयात देणार निवेदनं.*

इमेज
 *बीडी उत्पादनावरले संत तुकारामाचे महाराजांचे दिलेले नाव हटवण्याची लेखी मागणी* *महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडावाडयात देणार निवेदनं.* अंबाजोगाई ( प्रतिनिधी)  मागच्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदायाची अस्मिता,कळसस्थान, किंबहूना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाचा व फोटोचा वापर करणाऱ्या बीडी उत्पादन करणाऱ्या निजामाबाद येथील उत्पादक कंपनीवर दंडात्मक कार्यवाहि करुण बिडी वरील नाव हाटवण्याची लेखी मागनीचे निवेदन महादेव महाराज बोराडे यांनी जिल्हाउपाधीकारी अंबाजोगाई यांना दिले आहे. निजामाबाद येथी बिडी उत्पादक कंपनीने संत तुकाराम महाराजांच्या नावाने हे उत्पादन सुरू केले आहे. सदरील उत्पादकाने संपूर्ण वारकरीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनमनाच्या भावनांचा घोर अपमान केला आहे.श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते  उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंबाजोगाई  यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंड

MB NEWS:कंगना वादात आता राज्यपालांचीही उडी, राज्यसरकारवर नाराजी

इमेज
 *⭕कंगना वादात आता राज्यपालांचीही उडी, राज्यसरकारवर नाराजी ⭕*   मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत प्रकरणी राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राज्यपालांनी राजभवनवर बोलवून घेतलं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली.     अजोय मेहता आणि राज्यपाल या दोघांमध्ये बुधवारी चर्चा झाली. या प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. कंगना वादात आता राज्यपालांनीही उडी घेतली असून राज्यसरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.     कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण पेटलं. शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने ट्विट करत आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं म्हटलं. या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारकडून Y सुरक्षा देण्यात आली.      बुधवारी महानगपालिकेने कंगनाचं कार्यालय अनधिकृत असल्याचं म्हणत त्यावर कारवाई केली. कंगनाने मुंब

MB NEWS:लातूर- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

इमेज
 लातूर- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न  लातूर .....मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निराश झालेल्या चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज गुरुवारी (दि. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास चाकूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली. किशोर कदम (वय २५) असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे.  प्रारंभी त्यास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली. सदर युवक उच्चशिक्षित असून तो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. आरक्षणासाठी केलेली लढाई व नोकरी मिळवण्यासाठी केलेली मेहनत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे वाया गेली आहे. व्यथित होऊन मी हे कठोर पाऊल उचलत असल्याचे त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

MB NEWS:पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध

इमेज
 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 -----------------------------------  *◼️पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध* -----------------------------------  बीड, : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षण स्थगित होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्याचे पडसाद उमटले आहेत. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचा तीन पायाची खुर्ची जाळून तीव्र निषेध केला. त्याचबरोबर राज्यभर पुन्हा एल्गार करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा कार्यकर्त्यानी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्

MB NEWS:भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस समाजउपयोगी व विविध उपक्रमांने होणार साजरा-गणेश मुंडे

इमेज
  भाजप युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस समाजउपयोगी व विविध उपक्रमांने होणार साजरा-गणेश मुंडे*  • _गरजूंना मदतीचा हातभार देणार_ • परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या दि.11 सप्टेंबर रोजी वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता गरजुवंतांना मदतीचा हात देऊन व विविध सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत साध्य पध्दतीने साजरा होणार असल्याची माहिती राजेश गित्ते मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश मुंडे यांनी दिली आहे.           पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे खंदे समर्थक व हरीसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या वाढदिवस कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साध्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळ गोपीनाथगड येथे वृक्षारोपण कोरोना संकटात हैराण झालेल्या नागरिकांना अन्नदान, कोरोना काळात आहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांना मास्क व सँनिटायझर, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या कर्मचारी यांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विवि

MB NEWS:अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर अमरण उपोषण* मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

इमेज
  अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर अमरण उपोषण* मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार परळी वैजनाथ - (प्रतिनिधी)        अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून नंदकिशोर चिखले यांनी परळी न.प. समोर अमरण उपोषण सुरू केले आहे.मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.      चंद्रकांत लक्ष्मणराव चिखले यांनी परळी नगर परिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून बारा वर्षे सेवा केल्या नंतर सेवा चालू असतानाच दिनांक - १/९/२०१५ रोजी पाणीपुरवठा मोटार पंपाचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला.लाड कमिटीच्या शिफारशी नुसार सेवेतील मयत कर्मचाऱ्याच्या जागी कुटुंबातील व्यक्तीस सेवेत सामावून घेणे अपेक्षित असताना, वडिलांच्या जागी परळी वैजनाथ नगर परिषदेत नौकरी मिळण्यासाठी नंदकिशोर चिखले यांनी दिनांक ०२/११/२०१५ रोजी अर्ज केला परंतु उडवा उडवीच्या उत्तरा शिवाय पदरात काहीही पडले नाही. न.प.कडे विनंती अर्ज करून ५ वर्ष झाली तरी त्यावर कसल्याच प्रकारे विचार केला गेला नाही. हा माझ्या कुटुंबावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय ना