परळी नगर परिषद निवडणुक ; पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात 41,023 पुरुष, 38,543 महिला आणि 3 इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर, चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर, आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होईल. या निवडणुकीत 17 प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य, तर प्रभाग क्रमांक 10 मधून तीन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण 35 नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक...