
अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष आस्था रेल्वे परळीवैजनाथ/ प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मराठवाड्यातून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी तीन रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे. मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विविध ठिकाणाहून आस्था रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून तीन रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. 14 फेब्रुवारी नांदेड येथून नांदेड- आयोध्या (07636) ही विशेष रेल्वे औरंगाबाद मार्गे धावणार आहे. नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, भुसावळ मार्गे ही रेल्वे अयोध्या येथे पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासात 16 फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद - अयोध्या (07297) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंग...