पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे परळी (प्रतिनिधी)          भारताचे माजी पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी .मुंडे (सर )यांनी केले       परळीतील संपर्क कार्यालयांमध्ये डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉ. मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते फारुख भाई ,महेमुद भाई ,बाबा शेख , इलियास भाई काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जम्मू सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजिद, गफार भाई बागवान ,शेख फैय्याज ,मतीन मणियार, शेख सिकंदर, शेख जावेद, मुईज नवाब आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते        पुढे बोलताना प्रा .टी.पी .मुंडे (सर )म्हणाले की डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जीवन तरुणांना प्रेरणा देणारे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्यामुळेच आज देश

धनंयज मुंडेंनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा

इमेज
शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या धनंयज मुंडेंनी मांडल्या  मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बीड दि.12.......... मुख्यमंत्री महोदय यावर्षी 1972 वर्षापेक्षाही भिषण दुष्काळ आहे, तुम्ही कागदावर दुष्काळ जाहिर केला असला तरी, उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना खरोखरच आधार द्यायचा असेल तर हेक्टरी 50 हजार रूपये तातडीने मदत द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यंानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  बीड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज जिल्ह्यात आले होते, मागील 8 दिवसांपासून दिवाळीचा सण साजरा न करता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेणार्‍या धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या या व्यथा आणि वस्तुस्थिती या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. या बैठकीत प्रस्तावित करताना जिल्हाधिकार्‍यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई, पिक विमा याचे शंभर वाटप व कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी झाल्याचे आकडे सादर केले. त्याचा धागा पकडत बोलताना श्री.मुंड

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

इमेज
परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष पुस व पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बीड दि.12.......... परळी वैजनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणात केवळ 17 टक्के पाणी साठा राहिल्याने परळी शहराला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, त्यासाठी संपुर्ण पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून परळीच्या पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पुस व 20 खेडी व पट्टीवडगाव व 9 खेडी पाणी पुरवठा योजनेचे वीज बील माफ करून या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.      बीड जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये आले असता ना.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. वाण धरणावर परळी शहरासह नागापूर, आस्वलांबा, दौनापूर, टोकवाडी डाबी या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच वैद्यनाथ कारखान्याला येथुनच पाणी पुरवठा होतो. सद्या धरणात
इमेज
मुख्यमंत्री दौरा: सकारात्मक पाउल... ! बीड जिल्ह्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद बीड /प्रतिनिधी ........               बीडमध्ये भीषण दुष्काळ असून त्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सध्या खरीप हंगामावर संकट असल्याचेही म्हटले. बीडमध्ये दुष्काळ दौर्‍यादरम्यान घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.             बीडमध्ये दुष्काळ असून अन्न्याधान्याच्या नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे पाणी नसेल तिथे चारा छावण्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी एकूण 2162 योजना मान्य केल्या असून बीडसाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री दौरा : दुष्काळी परिस्थितीत पदरात काही पडणार का?

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद! ● शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करावे व हेक्टरी अधिकाधिक मदत देण्याची गरज ● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी ............           संपुर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे.यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने सर्वच समाजघटक या भयावह परिस्थितीत होरपळून निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख नेतेमंडळी दुष्काळ पहाणी दौरा करत आहेत.बीडच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दौरा करून पाहिली आहे.आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१२ रोजी बीड दौऱ्यावर येत आहेत.मुख्यमंत्र्यां च्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.          राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त  अहवालानुसार गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले.या मध्ये बीड जिल्हयातील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळी भा