गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... इंद्रायणी प्रतिष्ठान संचलित जिजामाता विद्यालय धर्मापूरी येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक गुरुदत्त छगनबुवा पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करदादा नागरगोजे,वीणा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिलीपराव गित्ते,महाराष्ट्र भूषण, डॉ.धर्मवीर भारती,माजी प्राचार्य ईश्वर क्षीरसागर,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणअण्णा फड श्री शंकर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एल.गित्ते,नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.चाटे,संत भगवान बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक ढगे,मुख्याध्यापक अविनाश शेटे,गोविंद सोनपिर,हनुमंत कराड,मोहन कांदे, विष्णू भताने, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. गित्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. गुरुदत्त पुरी यांनी या संस्थेमध्ये ३२ वर्षे प्रदीर्घ सेवा केली.यानिमित्त त्यांचा सपत्...