पोस्ट्स

जून २, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते,

इमेज
पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे-सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख  सामाजिक बांधिलकी जोपासत संजय देशमुख यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप परळी वैजनाथ दि.०१(प्रतिनिधी)       मराठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते, पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी केले. ते गाढे पिंपळगाव येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.           गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी १० वर्षं सेवा केली. त्यानंतर ते माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी नौकरी केलेल्या जुन्या शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेला भेट वस्तू दिल्या. यानिमित्ताने शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत माजी विद्यार्थी आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गोपीनाथ सोनवणे व शिक्षकांनी संजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सपत्न...
इमेज
*कु.समृद्धी मनोजराव जब्दे घवघवीत यश* परळी (प्रतिनिधी)                कु.समृद्धी  मनोजराव जब्दे हिने इयत्ता दहावी शालांत परिक्षेत 90टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (10 वी ) च्या परीक्षेत परळी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोजराव जब्दे यांची कन्या कु.समृद्धी हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पालक,मित्र परिवार,शाळेचे शिक्षक व आप्तेष्टाकडुन अभिनंदन होत आहे.
इमेज
* लोकसभेतील 'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा*  ● _८ ते ११ जुन दरम्यान पहिला टप्पा_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......          बीडच्या लोकसभा निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघांमध्ये अपेक्षित  'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा काढणार आहेत. ८ ते ११ जुन दरम्यान या आभार दौऱ्याचा  पहिला टप्पा असणार आहे.          लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीडची राजकीय लढाई चांगलीच रंगली होती.या मध्ये मुंडे भगिनींना निर्विवाद विजयश्री मिळाली.राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड च्या पालकमंत्री असलेल्या ना. पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे हे नेते आपापल्या पक्षाचे राज्य स्तरावर नेतृत्व करतात.त्यामुळे राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली गेली.  भाजपच्या हाती असलेले एकहाती यश पुन्...
इमेज
* मांडवा येथील शेतकरी दुष्काळी अनुदाना पासून वंचित*!  ● _अनुदान वाटप करण्याची मागणी अन्यथा आंदोलन_ ● परळी वै./प्रतिनिधी...        दुष्काळी परिस्थितीत होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कडूनही दुष्काळी अनुदाना पासून वंचित ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केल्याच्या घोषणावर घोषणा देणाऱ्या सरकारचे पितळ परळी तालुक्यात उघडे पडले आहे.   तालुक्यातील मांडवा येथील  शेतकरी अध्यापही दुष्काळ अनुदान पासून वंचित असून . तात्काळ हे अनुदान खात्यावर जमा करावे आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.       दुष्काळाच्या झळांमध्ये होर पळलेला मांडवा येथील शेतकरी आपले दुःख विसरून पेरणी करण्याची तयारी करताना दिसत आहे.पण सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान  दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार शेतकऱ्यांना आद्याप मिळाले नाही . शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे , खत खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारकडे जाण्याची वेळ आली आहे.           सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान 50-50% असा प्रक...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या