पोस्ट्स

एप्रिल २१, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  संत जगमिञनागा मंदिरचे पुजारी वे.शा.सं. शामराव औटी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             संत जगमित्र नागा मंदिराचे पारंपारिक वंशज पुजारी व विश्वस्त वेदशास्त्रसंपन्न शामराव औटी गुरुजी यांचे आज दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परळीच्या शैक्षणिक व धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.             सेवानिवृत्त शिक्षक असलेले वे.शा.सं. शामराव औटी हे परळीतील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. वयोमान व अल्पशा आजाराने आज दिनांक 25 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 82 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.जुन्या पिढीतील तत्त्वनिष्ठ व आध्यात्मिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शामराव औटी हे अतिशय संयमी, मृदुभाषी, व  सुस्वभावी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.   उद्या अंत्यसंस्कार दरम्यान, कै. शामराव औटी यांच्या पार्थिवावर आज दिनांक 26 रोजी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांचे निवासस्थान असलेल्या जगमित्र नागा मंदिर येथून सकाळी ९ वा.अंत्ययात्रा निघणार आह

१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी.

इमेज
१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी. परळी वैजनाथ: प्रतिनिधी...        १ मे जागतीक कामगार दिनानिमीत परळी येथे 'आर्य समाज मंदिरच्या हॉल मध्ये दुपारी 12 वाजता परळी तालुक्यातील कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.         मेळाव्याचे उद्‌घाटन अर्थशास्त्र तज्ञ, कामगारांच्या प्रश्नांची  सखोल जाण असणारे रोहिदास जाधव करणार आहेत. दरवर्षी १मे कामगार दिन  परळी येथे साजरा केला जातो व तज्ञ कामगार नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाते. मेळाव्यात देशातील कामगारांची परिस्थिती, राज्यातील कामगारांची परिस्थिती व जिल्हयातील कामगारांच्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. कामगारांनी वर्षभर दिलेले लढे, मिळालेले यश व न सुटलेले प्रश्न तसेच राज्यसरकार व केंद्र सरकारची  भूमीका याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.मेळाव्यात शेतकरी नेते मुरलीधर नागरगोजे, कामगार नेते काॅ. प्रभाकर नागरगोजे व सीटू अध्यक्ष प्रा-बी जी खोड यांचे मार्गदर्शन होणार आहे. परळी तालुक्यातील बांधकाम कामगार, आशा कार्यकर्ती, शालेय पोषण आहार कामगार, नगरपालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे

बहिणीच्या रॅलीत पंकजाताई रथात तर धनुभाऊ कार्यकर्त्यांसोबत पायी चालत!

इमेज
  बीडमध्ये धनंजय मुंडेंचे तडाखेबंद भाषण :  महत्वाचे १० मुद्दे धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाने महायुतीची विजयी संकल्प सभा गाजवली * प्लॉटिंगशिवाय थोडीही शेती नावावर नसणारा कारखानदार शेतकरी पुत्र कसा - धनंजय मुंडेंचा घणाघात* * बहुरंगी उमेदवाराचे मराठा आरक्षणाच्या लढ्यात मागील 20 वर्षात काय योगदान? - मुंडेंचा प्रश्न* *मुंडे घराण्याने मराठा सह विविध समाजाच्या कुटूंबातील नेतृत्व घडवले, आमदार-खासदार केले, तेव्हा कधी कोणाची जात पाहिली नाही !*  * धनंजय मुंडेंनी 1952 पासूनच्या खासदारांची मांडली जातींसह यादी* *स्वतः गुपचूप कुणबीचे आरक्षण घेऊन केज खरेदी विक्री संघ निवडणुकीत लाभ मिळवलेला व्यक्ती इतरांना काय न्याय देणार?*  * नगर-बीड-परळी रेल्वे तर धावेलच पण केंद्र व राज्यात एका विचाराचे सरकार राहिल्यास, परळी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पाच वर्षात धावेल - धनंजय मुंडे* * विधानसभा निवडणुकीचे नियोजन फिक्स, कोणीही काळजी करण्याची गरज नाही - मुंडेंनी महायुतीतील नेत्यांना दिला विश्वास! रमेश आडसकरांनी विधनासभेचा विषय काढला आणि संपूर्ण सभेत पिकला हशा!* *मोदींजींच्या नेतृत्वात विकासाचे अविरत पर्व जिल्ह्या

आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक सहाव्या दिवशी  29 उमेदवारी अर्ज दाखल आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल बीड, दि.24 : (जिमाका)  39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज सहाव्या दिवशी 29 नामनिर्देशन अर्ज दाखल झाली असून आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.  39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 29 उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष), करूणा मुंडे(स्वराज्य शक्ती सेना), हिदायत सादेख अली सय्यद (अपक्ष),अंबादास जाधव (अपक्ष), सादेक हुसेन महम्मद (अपक्ष), संतोष उत्त्म रासवे (अपक्ष), सलाउद्दीन खान पठाण (अपक्ष),गणेश व्यंकटराव कस्पटे (अपक्ष), सादेक इब्राहीम शेख (अपक्ष), अशोक सुखदेव हिंगे (वंचित बहुजन आघाडी), पंकजा गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी चार अर्ज दाखल केले, प्रितम गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले, श्रीराम विठ्ठलराव खळगे (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख(अपक्ष), सुलेमान खैरोद्दीन महमद (अपक्ष),भिमराव जगन्नाथ दळे (अपक्ष),रहेमान बाहोद्दीन सय्यद (अपक्ष), राजेंद्र अच्युतराव होके(अपक्ष), जावेद सिकंदर मोमीन (अपक्ष), लक्ष्मीबाई बाजीराव मोरे

सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा-धनंजय मुंडे

इमेज
 जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले पाच वर्षांसाठी एक संधी द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार ; अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या -पंकजाताई मुंडेंचे बीडच्या जाहीर सभेत आवाहन *विरोधी उमेदवार बहुरंगी;* *जातीधर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर जिल्हा* सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा-धनंजय मुंडे *बीडच्या विराट सभेत महायुतीच्या एकजुटीचे दर्शन* बीड । दिनांक २४। नि:स्वार्थ प्रेम करणारी जनता माझ्यासोबत आहे. जिल्ह्यातील सर्व जनता हेच माझे वैभव आहे, मात्र कांही जणांची दृष्ट याला लागते. निवडणूकीत गाफील राहू नका. मी एका पराभवाला सामोरे गेले आहे. पराभवानंतर जनतेच्या साक्षीने मी समाजकारणात राहिले.अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले, त्यानंतर आता मला संधी मिळाली आहे. ही निवडणूक अवघड आहे. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणणार नाही, कारण ज्या दिवशी मुंडे साहेबांच्या गळ्यात हार घालायचा होता, त्याचवेळी त्यांचेवर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. त्यामुळे आपले त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी या लोकसभेत आपल्याल

साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान. डॉ. व्ही जे चव्हाण

इमेज
  साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान. डॉ. व्ही जे चव्हाण  परळी वैजनाथ: येथील वैद्यनाथ महाविद्यालयात इंग्रजी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिन व जागतिक इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. व्ही जे चव्हाण उपस्थित होते तर उपप्राचार्या डॉ व्ही बी गायकवाड अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ चव्हाण यांनी जगप्रसिद कवी आणि नाटककार विलियम सेक्स्पियर यांच्या जीवन व लेखणावर प्रकाश टाकला व त्याचे साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान आहे असे उदगार काढले. अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ गायकवाड ह्यांनी वाचन संस्कृतीचे महत्व सांगून वाचाल तर वाचाल असा संदेश दिला. याप्रसंगी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, डॉ टी ए गीत्ते, प्रा एन एस जाधव, प्रा ए आर चव्हाण, प्रा ए डब्लू वडाळ, डॉ एस ए धांडे,प्रा चाटे, प्रा तिवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रंथपाल डॉ धांडे यांनी मानले.

दुखःद वार्ता: प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांची महाविद्यालयातच आत्महत्या

इमेज
  दुखःद वार्ता:  प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी  यांची महाविद्यालयातच आत्महत्या अंबाजोगाई, प्रतिनिधी.... बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई संचलित बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी आज सायंकाळी 4:30 वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी 4 वाजता महाविद्यालयाचे नियमित कामकाज व्यवस्थितपणे करुन सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर लगेचच प्राचार्य डॉ. फुलारी यांनी ही आत्महत्या केली असल्याचे समजते. महाविद्यालयाच्या इमारतीची झाडझुड करीत सेवक प्राचार्य डॉ. फुलारी यांच्या पारदर्शक कॅबिनपर्यंत पोहोचताच त्यांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्याने ही माहिती संस्थेच्या इतर कर्मचारी व संचालकांना दिली. प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी हे गेली अनेक वर्षांपासून या संस्थेने सुरु केलेल्या विविध शैक्षणिक युनीट मध्ये कार्यरत होते. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे बरीच वर्षांपासून प्राचार्य पदांची जबाबदारी होती. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमातील एक गुणवान, हुषार, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे प्राचार्य म्हणून डॉ. नंदकिशोर फ

अभंग चिंतनाऐवजी इतर विषयांचा भडीमार हा चिंतेचा विषय- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

इमेज
अभंग चिंतनाऐवजी इतर विषयांचा भडीमार हा चिंतेचा विषय- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे  सिरसाळा (प्रतिनिधी) अलिकडे कीर्तनाची पध्दती बदलली गेली असून कीर्तनात अभंग चिंतनाऐवजी अवांतर विषयांचा भडीमार होत असून हि चिंतेची बाब आहे असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.            येथील शिवराम मंदिरात प्रतिवार्षिक श्रीराम नवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो.या सप्ताहात कीर्तन आंधळे महाराज यांनी, "धर्माची तू मूर्ती/पापपुण्य तुझे हाती//"या अभंगावर सखोल व मार्मिक भाष्य केले.पौराणिक आख्याने व संदर्भ,दाखले देत विवरण केले.ते पुढे म्हणाले की हल्लीची कीर्तन पद्धती हास्य विनोद, वेडेवाकडे नृत्य, अवांतर अनेक विषयांचा धुडगूस होत असून जो अभंगाशी सुसंगत नसतो.अभंग न सोडवता 'तमाशाप्रधान वग' पण लाजेल इतकी अश्लाघ्य व अश्लील भाषा कीर्तनात रूढ झाली.याला कीर्तनकार, तसेच आयोजकच जबाबदार असून ही गंभीर व घातक बाब आहे.       यावेळी ह.भ.प.श्री वैजनाथराव देशमुख, ह.भ.प. श्रीबाळु महाराज बडे खामगावकर,  ह.भ.प.श्री प्रभाकरराव आघाव , श्री पद्माकर

महापुरुषांना अभिवादन करून माने कॉम्प्लेक्सला होणार विजयी संकल्प सभा

इमेज
  बीड लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात रॅलीचे आयोजन  महापुरुषांना अभिवादन करून माने कॉम्प्लेक्सला होणार विजयी संकल्प सभा बीड ।दिनांक २३। भाजप,महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या उद्या २४ तारखेला दुपारी उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. महायुतीच्या फायरब्रँड नेत्या पंकजाताई मुंडे यांचे 'होमपीच' असलेल्या बीड शहरात त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आज दुपारी तीन वाजता अभूतपूर्व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप नगर रोड जवळील माने कॉम्प्लेक्स येथे मैदानावर होईल. यादरम्यान पंकजाताई मुंडे महापुरुषांना अभिवादन करत सभास्थळी पोहोचतील.त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर नेते सभेला संबोधित करणार आहेत.  पंकजाताई मुंडे या आज बीड लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने भाजपसह महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.  राज्या

विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरती

इमेज
  श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव  उत्साहात साजरा विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरती  परळी वैजनाथ/प्रतिनिधी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिराच्या जवळ असलेल्या श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींची पूजा व आरती श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे विश्वस्त विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.  हनुमान जयंतीनिमित्त श्री बजरंग बली वेताळ मंदिर  विद्युत रोषणाईने  व फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. महिलावर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित भाविकांचे स्वागत मंदिराचे महंत श्री विलासानंदजी महाराज यांनी केले.  श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात फुलांची व रांगोळीची सुंदर व आकर्षक सजावट करून मंदिर सजविले होते. यावेळी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त पूजा व आरती श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे विश्वस्त विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच उपस्थित भावि

देशाला महाशक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही : पंकजाताई मुंडे

इमेज
  देशाला महाशक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही : पंकजाताई मुंडे जिजाऊंच्या जन्मभूमीत संघर्षकन्येचं उत्स्फूर्त स्वागत:पंकजाताई मुंडेंच्या सभेला  सिंदखेडराजात लोटली  अलोट गर्दी बुलढाण्याची जागा निवडून द्या: बीडबरोबरच मी बुलढाण्याचा आवाज बनून काम करेल प्रतापराव जाधवांना विजयी करा : विकासाची जबाबदारी माझी बुलढाणा ।दिनांक २४। देशात शांतता प्रस्थापित करायची असेल, गरीबांचं कल्याण करायच असेल, जगात भारताला सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. गोरगरीब, वंचितांची पीडा मोदींनाच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि बुलढाण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. तुम्ही बुलढाण्याची जागा निवडून द्या ,बीड बरोबरच बुलढाण्याचा आवाज बनून मी काम करेल असा विश्वास भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुसरबीड तालुका सिंदखेड राजा येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.         बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा

जानकरांच्या विजयासाठी सारेच सरसावले !

इमेज
  महादेव जानकरांसाठी आज सीएम- डीएम व पीएम यांच्या परभणीत सभा : जानकरांच्या विजयासाठी सारेच सरसावले परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धारच महायुतीतील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. ही जागा निवडून आणण्यासाठी थेट पंतप्रधानांपासून राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व प्रमुख स्टार प्रचारक असलेल्या धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह नेतेमंडळी परभणी मतदार संघात प्रचार करून हा मतदारसंघ अक्षरशः पिंजूर काढताना दिसत आहेत. या अनुषंगानेच आज (दि.२३) महादेव जानकरांसाठी सीएम, डीएम व पीएम यांच्या जाहीर सभा होणार आहेत.          भारतीय जनता पार्टी महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रासपचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ वरिष्ठ नेत्यांनी धडाका लावला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित  पवार,पंकजा मुंडे यांनी जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही महादेव जानकर यांसाठी परभणी येथे सभा झाली. त्यानंतरही अनेक स्टार प्रचारक परभणी जिल्हा पिंजून काढत असून महादेव जान

आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक चौथ्या दिवशी  ६ उमेदवारी अर्ज दाखल तीन अपक्ष तर तीन पक्षाकडून अर्ज दाखल आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल बीड, दि.22 : (जिमाका)  39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.  39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे , तुकाराम विठोबा उगले  तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तीन अर्ज सादर करण्यात आले. दोन अर्ज बजरंग मनोहर सोनवणे यांचे आहेत तर एक सारिका बजरंग सोनवणे यांचा अर्ज आहे. या सर्व उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष अर्ज सादर  केला.    सोमवारी 14 इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.  आजपर्यंत एकूण 94 इच्छुक उमेदवारांना 211 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले.  39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत 10 उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची

बुलढाणा, परभणी मतदारसंघात

इमेज
  भाजपच्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांच्या उद्या बुलढाणा,  परभणी मतदारसंघात जाहीर सभा स्वतः उमेदवार म्हणून बीडचा प्रचार सांभाळत पक्षाच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठीही योगदान परळी ।दिनांक २२।भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व भाजपाच्या स्टार प्रचारक असलेल्या पंकजाताई मुंडे या स्वतः बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार आहेत. सध्या बीडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.मात्र स्वतः उमेदवार म्हणून बीडचा प्रचार सांभाळत पक्षाच्या इतर ठिकाणच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठीही पंकजाताई मुंडे यांचे विशेष योगदान असणार आहे. याच अनुषंगाने आज दिनांक 23 रोजी परभणी व बुलढाणा या मतदारसंघात पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.         बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 2.10 वाजता जिंतूर जिल्हा परभणी येथे जाहीर स

ताई तुम्ही उमेदवार नव्हे,खासदारच ; दिव्यांगांनी दिला आशीर्वाद

इमेज
  परळीत दिव्यांग बांधवांनी दिले पंकजाताई मुंडेंना 'विजयी भव' आशीर्वाद संसदेत दिव्यांग बांधवांचा आवाज बनून काम करेल पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने दिव्यांगही गहिवरले ! पंकजाताई आश्वासक नेतृत्व : त्यांना साथ द्या - डाॅ. संतोष मुंडे परळी वैजनाथ।दिनांक २२। दिव्यांगांच्या जीवनात आनंद यावा यासाठी मी हात नसलेल्यांचे हात, दृष्टी नसलेल्यांची दृष्टी आणि शब्द नसलेल्यांचे शब्द होईल. तुमच्यात मला देव दिसतो. तुमच्यासाठी काही तरी करू शकेल एवढी शक्ती मला मिळावी. जीवात जीव असेपर्यंत तुमच्या सेवेसाठी कशाचाही विचार करणार नाही, तुमच्या आशीर्वादाने  संसदेत तुमचा आवाज बनुन काम करेल अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज दिव्यांग बांधवांची मने जिंकली. पंकजाताईंच्या भाषणाने गहिवरून गेलेल्या दिव्यांग बांधवांनी त्यांना मनापासून 'विजयी भव' चे आशीर्वाद दिले. दरम्यान पंकजाताई हे आश्वासक आणि विश्वासक नेतृत्व असून मंत्री असताना त्यांनी दिव्यांगांसाठी निधी वाढवून दिला, आता त्यांचेसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे, त्यांना मोठया मताधिक्याने संसदेत पाठवा असं आवाहन दिव्यांग कल्याण मंत

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

इमेज
  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन  बीड, दि 21 (जीमाका):  मतदान करणे हा आपला हक्क आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.  आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 39 बीड मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध विभागांची बैठक आयोजित केली, यावेळी  त्या संबोधित करीत होत्या. याबैठकीस  जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम सारूक उपस्थित होते. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावरून प्रत्येकांनी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी बीड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन करुन, स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी जागरूक करणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते पार पाडावे असे, त्या यावेळी म्हणाल्या. यासह आपण सर्व शासनाचा भाग आहोत. निवडणुकीच्या एकूण

गेलीस काळजावर गोंदून माझे नाव

इमेज
  गझलकार प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे लिखीत आणि प्रा.राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली गेलीस काळजावर गोंदून माझे नाव गझल आली रसिकांच्या भेटीला  परळी प्रतिनिधी.        प्रसिद्ध गजलकार प्रा.डॉ. मुकुंद राजपंखे यांनी लिहलेली व प्रसिद्ध संगीतकार आणि गायक प्रा .डॉ. राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली गेलीस काळजावर गोंधळ माझे नाव ही गझल  नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे .हे गजल युट्युब वर रसिकांसाठी उपलब्ध झालेली आहे. या गझलेला रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.     मराठी गझल  "गेलीस काळजावर गोंदून नाव माझे " गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांनी लिहिलेली व गायक प्रा.राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली व संगीत संयोजन विशाल बोरुळकर यांनी केलेले आहे. या संगीतबद्ध केलेल्या गजलेवर सुंदर असे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.त्यात अभिनय एस.ऋतुराज यांनी केलेला आहे. तसेच या गझलचे चित्रीकरण हर्ष फड , व्यंकटेश दौंड , वैभव बळवंत, अथर्व नागरगोजे , माऊली फड यांनी केलेले आहे तरी सर्व रसिक श्रोत्यांनी ही गझल MRJ PRODUCTION या यूट्युब चैनल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे गायक प्रा डॉ राहुलकुमार

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

इमेज
  खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार पंकजाताई मुंडे विकासाचे व्हिजन असलेल्या सुसंस्कृत उमेदवार ; मतदारच देत आहेत विजयाची ग्वाही माजलगाव । दि. २१ । भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांच्या डोअर टू डोअर भेटी घेतल्या. राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्या काळात झालेली विविध विकास कामे नागरिकांचे जीवनमान उंचावणारे असल्यामुळे पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेल्या, सुसंस्कृत उमेदवार आहेत, ज्यांनी विकास केला आहे आणि करण्याची क्षमता आहे अशा उमेदवार म्हणून आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहोत, त्यांचा विजय निश्चित आहे अशा भावना या दौऱ्यादरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खा. प्रितमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील सुरेश भानप, लक्ष्मीकांत मुंदडा, ओंकार खुरपे, ॲड.विश्वास जोशी प्रा. मगर,ॲड. लवटे, अच्युतराव लाटे या

३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: फसवणूक प्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला केलं अटक

इमेज
  ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: फसवणूक प्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला केलं अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......       ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार करुन  हैदराबादच्या एकाने परळीतील वीट उद्योग व्यापाऱ्याची  फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला अटक केली आहे.       परळीतील फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख रा. इस्लामपुरा बंगला परळी वै. यांच्याशी आरोपी खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद याने वीटा खरेदीचा व्यवहार केला.यातील आरोपीने फिर्यादीकडून 39,02,700/- रुपयांच्या विटा घेवुन गेला. त्यापैकी एकुण रक्कम रुपये 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) फिर्यादीच्या खात्यावर पाठवले. अजुन त्याच्याकडे बाकी 1402,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपये असुन त्यापैकी  11,42,000/- चा चेक दिला मात्र तो चेक वटला नाही. तो खोटा व बनावट धनादेश देवुन एकुण 1404,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपयांची फसवणुक करुन  विश्वासघात केला. असा तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशी वरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल

सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी परळीत दिव्यांग,विधवा,जेष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्या संवाद बैठकीचे आयोजन : डॉ संतोष मुंडे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे परळी : प्रतिनिधी       बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डॉ संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल हॉल अरुणोदय मार्केट समोर सकाळी ठीक 9:30 वाजता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, 39-बीड लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ  राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या: श्रीनाथ हॉस्पिटल हॉल अरुणोदय मार्केट समोर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद बैठकीस महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे या दिव्यांग, विधवा, जेष्ठ नागरिक व माजी सैनिक यांना संवाद साधून त्यांच्य

सार्थ निवड: सर्व स्तरातून अभिनंदन!!!!!

इमेज
  मसापच्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अनिलकुमार साळवे येत्या 23 एप्रिल रोजी फुले पिंपळगाव येथे मसाप शाखा माजलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य सेवेतील योगदानाबद्दल डॉ.अनिलकुमार साळवे या माजलगावच्या भूमीपुत्राचा हा सन्मान आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त साहित्यिक म्हणून डॉ. अनिलकुमार साळवे सर्वपरिचित आहेत. प्रा.डॉ. अनिलकुमार साळवे यांना वाचन लेखनात विशेष रस आहे. माजलगावच्या मातीत त्यांच्यावर साहित्यिक संस्कार झाले.त्याच काळात नाट्यलेखन सुरू झाले.कसलीही पार्श्वभूमी नसतांना उपजत प्रतिभेतून नाट्यनिर्मिती ते करू लागले.अनेक स्पर्धेत, महोत्सवात त्यांच्या लेखनाला -सादरीकरणाला प्रतिसाद व पारितोषिके लाभली. त्यांनी बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माजलगाव या गावी  झाला . त्यांचे शालेय शिक्षण माजलगाव येथे तर, महाविद्यालयीन शिक्षणही माजलगावात झाले.पदव्युत्तर पदवीसाठी  त्यांनी नाट्यशास्त्र विभाग