प्रा. व्ही. बी.देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

* आज "बेटा" शब्द - नि:शब्द .........!* - ♦ प्रा. रविंद्र जोशी ♦ एक वेगळा बाज, दिमाखदार व शाही वर्तन जे काही असेल ते धडक - बेधडक मांडण्याची नैसर्गिक वृत्ती आणि परळीत कोणीही असो त्याला चार चांगले शब्द सांगण्याचा -सुनावण्याची अधिकारवाणी असलेले प्रा. व्ही.बी.देशपांडे यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाने ते सर्वपरिचित होतेच त्याहीपेक्षा वडीलकीच्या नात्याला परिपूर्ण जपणारे व्यक्तीमत्व होते. प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा " बेटा" हा शब्द आज त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य बनलेला हा शब्द होता. आदरणीय सरांच्या जाण्याने जणू "बेटा" शब्द - नि:शब्द झाला आहे असे वाटते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!