07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा

कपिलधार येथे 07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अनिल अष्टेकर यांचे आवाहन *परळी वैजनाथ / प्रतिनिधी* शिवा अखिल भारतीय शिवा वीरशैव युवक सघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त होणार्या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र कपीलधार, ता. जि. बीड येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक उपस्थित राहतात. शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र कपीलधार येथे पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय महापुजा करण्यात येत आहे. दि. 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहीली शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या यात्रेनिमीत्त प्रतिवर्षी शासकिय महापुजा संपन्न होत आहे. यंदा 21 वी शासकीय महापुजा आणि शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा मोठया उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी तालुका व शहरातील सर्व वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श...