यशस्विनी : अभिनंदनीय

निवड: डॉ.पूजा सूर्यवंशी एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पशुधन विकास अधिकारी अंबाजोगाई.... अंबाजोगाई येथील डॉ.पूजा विजयकुमार सूर्यवंशी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ या पदासाठी निवड झाली. डॉ. पूजा सूर्यवंशी यांनी पदवीचे शिक्षण पशुैद्यकीय व पशुविद्यान विद्यापीठ, परभणी येथून पूर्ण केले असून पद्युत्तर शिक्षण अनुवांशिक व प्रजनन विभागात, राष्ट्रीय अनुसंधान संस्थान, कर्नाल हरियाणा येथून नुकतेच पूर्ण केले. या यशाबद्दल तिचे वडील विजयकुमार नारायणराव सूर्यवंशी व आई भाग्यश्री सूर्यवंशी यांना आकाश ठेंगणे झाले. मोठी बहीण प्रियंका आणि लहान भाऊ प्रवीण यांनी कौतुक केले. तसेच भाऊजी ,मामा आणि सर्व कुटुंबीय व नातेवाईकांनी अभिनंदन केले.