MB NEWS-परळी शहरातील वीज गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार

परळी शहरातील वीज गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार परळी वै…. गेल्या एक ते दीड तासापासुन शहरात वीज गायब झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी पाउणतास लागणार आहे. खंडीत वीज पुरवठयाने नागरिकांची चांगलीच तगमग झाली आहे.३३ केव्हढी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर परळी शहरातील लाईट येणार आहे.