पोस्ट्स

स्थिर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-दगदगीमुळे अशक्तपणा आहे:धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे

इमेज
  दगदगीमुळे अशक्तपणा आहे: धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे मुंबई-       दगदगीमुळे अशक्तपणा आला आहे.उपचार सुरू आहेत.धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.ते उद्या पर्यंत रिकव्हर होतील  अशी माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजप नेत्या पंकजा मुंडे  या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यंनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भोवळ आली होती, विकनेस आला होता, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहोत, आम्ही त्यांना भेटलो, ते उद्यापर्यंत रिकव्हर होतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  संबंधित बातम्या Click:*प्रकृती स्थिर-विश्

MB NEWS-पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

इमेज
  पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला मुंबई, प्रतिनिधी.....     आपले भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर *खा. सौ. सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.    धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.त्याचब

MB NEWS-*धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*

इमेज
 *दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली,  डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* *अजितदादांनी मुंडेंची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; भोवळ आल्याने धनंजय मुंडे यांची प्रकृती अस्थिर झाली होती - अजितदादा पवार* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट* मुंबई (दि. 13) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे.  आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या