पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई _

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना मोठा दिलासाःपरळी काँग्रेस पक्षाकडून आनंदोत्सव पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई परळी, प्रतिनिधी.... मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिल्याने परळीत काँग्रेस पक्षाच्या वतिने शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडुन व पेठे वाटुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला. या खटल्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असुन पुन्हा खा.राहुल गांधीचा आवाज संसदेत बुलंद होणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतिने परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाडी प्रमुखानी एकञ येत शहरातुन मोटार सायकल रॕली काढत छ.शिवाजी म...