पोस्ट्स

मे २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-परळीत 11 जून पासून श्रामणेर शिबीराचे आयोजन

इमेज
  परळीत  11 जून पासून  श्रामणेर शिबीराचे आयोजन परळी  ( प्रतिनिधी  ) येथिल भीमवाडी मधील ञिरत्न बुध्द विहारात  11  जूनपासून श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.        दहा दिवस चालणाऱ्या या श्रामणेर शिबिरासाठी भन्ते सुमेध नागसेन बोधी, भन्ते मुदितानंद, भन्ते पय्यातीस यांची धम्मदेसना व प्रवचन तसेच मार्गदर्शन मिळणार आहे. तरी ज्यांना या दहा दिवसीय श्रामणेर शिबीरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी भीमवाडी ञिरत्न महिला मंडळ, भीमवाडी मिञ मंडळ तसेच सिमाताई कांबळे मोबाईल क्रमांक  8459038081, विशाखा घाडगे, रंजना मस्के यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ************************************* या बातम्या देखील वाचा/पहा........ •  *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'* •  सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे* •  *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले* •  • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम* • *गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ह

MB NEWS-पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - कॉ पांडुरंग राठोड

इमेज
  पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - कॉ पांडुरंग राठोड परळी वै.ता. ४ प्रतिनिधी      परळी येथे ८ जुन रोजी होणाऱ्या विभागीय पिक विमा परिषदेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जेष्ठ नेते पांडुरंग राठोड यांनी केले आहे.        पिक विमा कंपनी चा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. किरकोळ त्रुटी दाखउन २०१८ चा हजारो शेतकऱ्यांना कोटयावधी रूपयाचा पिक विम्या पासुन वंचित ठेवले होते. परंतु महाराष्ट्र राज्य किसान सभेनी वेगवेगळया स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांना पिक विमा मिळउन दिला. २०२० चा पिक विमा शासनानी नुकसानीचा अहवाल देउनही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नाही. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा कंपनीचेच हित जोपासले जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी परळी येथे विभागीय पिक विमा परिषदेचे बुधवारी (ता.८) आयोजन करण्यात आले आहे.  • संबंधित बातमी: 🛑 *किसान सभेच्या वतीने ८ जुनला पिक विमा परिषद* पिक विमा परिषदेस उदघाटक म्हणुन शेती प्रश्नाचे अभ्यासक व जेष्ठ पत्रकार मा पी साईनाथ असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य सचिव कॉ अजीत नव

MB NEWS-सिरसाळा येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

इमेज
सिरसाळ्यात ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभारणार -धनंजय मुंडेंची घोषणा सिरसाळा ता. परळी (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म आणि नीतीने राज्य केले, परळी वैद्यनाथसह अनेक मंदिरांचा व धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सिरसाळा येथे बोलताना व्यक्त केले आहे.         सिरसाळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी मान्यवरांसह  अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.  हे देखील वाचा: •  🛑 *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*        सिरसाळा हे तालुक्यातील मोठे व प्रगतशील गाव असून, एम आय डी सी व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या बाजार उपपेठेच्या माध्यमातून इथे व्यापार व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. या गावाती

MB NEWS-धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'

इमेज
  धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड' परळी (दि. 04) -  अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम  वेगाने सुरू आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी धनंजय मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही!  Video   परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून,  पहिल्या टप्प्यात कन्हेरवाडी ते टोकवाडी या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 54 कोटी रुपये निधी खर्च अपेक्षित आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज वगळता सुमारे 80% काम पूर्णत्वाकडे आले आहे. मागील वर्षी 3 जुलै रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात टोकवाडी ते संगम या रस्त्याचे सुमारे पावणे तीन किलोमीटर चे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहर बायपासचा एक टप्पा आता पूर्णत्वाकडे आला असून, यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक व दळणवळण सुविधेत आमूलाग्र सकारात्मक

MB NEWS-स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले

इमेज
  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले अंबाजोगाई (प्रतिनिधी )-            स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरात अनेक इमारती आहेत त्यापैकी मुलांचे वस्तीगृह इमारत चनई रोडला आहे त्या इमारतीच्या परिसरात आज सकाळी कंपाउंड वॉल लगत मृत अवस्थेत असणारी स्त्री जातीचे अर्भक दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.            पोलिसांना घटनेची माहिती देताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तातडीने पोलिसांना पाठवून घटनेचा पंचनामा करून मृत अर्भक शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेघटनेची खबर पोलिसांना दिली पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक रुग्णालयाच्या ताब्यात दिले आहे ते अर्भक स्त्री जातीचे सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  या बातम्या देखील वाचा/पहा........ •  *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'* •  सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे* •  *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले* •  • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन,

MB NEWS-इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम

इमेज
  इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम माजलगाव, एमबी न्युज वृत्तसेवा: येथील माजी मुख्याध्यापक कै.रत्नाकरराव कुलकर्णी यांचे चिरंजीव इंजिनिअर मिलिंद कुलकर्णी यांनी एसटीची इलेक्ट्रिक बस डिझाईन केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करत ही बससेवा नगर पुणे महामार्गावर प्रवाशांच्या सेवेत ही बस सुरू झाली असुन त्यांनी केलेल्या या कार्याचा देशभरात डंका वाजत आहे. एसटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत मिलिंद कुलकर्णी यांच्या सिटीन इंजिनिअरिंग ॲटोमोटिव्ह डिझाइनिंग कंपनीने डिझाईन केली आहे. ही कंपनी देश विदेशातील बहुतांश नामांकीत कंपन्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने डिझाईन व डेव्हलपमेंटमध्ये काम करते. कंपनीने बनवलेली इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असुन याची लांबी १२ मिटर आहे तर दोन बाय दोनचे सिट्स आहेत. या बसची आसणक्षमता ४३ प्रवासी इतकी असून सचा तासी वेग ८० किलोमीटर इतका आहे. ध्वनी व प्रदूषणमुक्त ही बस असून कॅमेरा सिस्टम बसविण्यात आले आहे. याची बॅटरीइलेक्ट्रिक बसची सोय केली आहे.

MB NEWS-गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन

इमेज
  गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन   परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...         दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला अलोट गर्दी झाली होती.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिदिन समारंभ झाला.या समारंभात व्यासपीठावर कार्यक्रमाच्या शिरस्त्याशिवाय नेहमीपेक्षा वेगळा व अभिनव उपक्रम बघायला मिळाला.या समारंभात पाच बालिकांचे व्यासपीठावर शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.           मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शनानंतर ते व्यासपीठावर आले. यावेळी प्रतिमापुजन झाले.त्यानंतर .या समारंभात पाच बालिकांचे व्यासपीठावर शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे,अॅड.यशश्री  मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.स्त्री शक्तीची उपासना ही आपली संस्कृती आहे. बालिका पुजनाची आपल्याला मोठी परंपरा लाभलेली आहे.आपल्याकडे नवरात्र

MB NEWS-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!

इमेज
  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं  महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे आज परळी येथे गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवराजसिंह चौहान यांचं  महाराष्ट्राशी  जिव्हाळ्याचं नाजुक नातं असल्याचा उलगडा झाला.                    याप्रसंगी आपल्या सात्विक आणि संयमित भाषेत त्यांनी केलेले भाषण सर्वांनाच मोहित करून गेले. त्यांच्या भाषणाची मांडणी आणि धीरोदात्तपणा व आत्मविश्वासपूर्ण शैलीने सर्वांनाच आकर्षित केले. यावेळी भाषण करत असताना त्यांनी काही वाक्ये अस्खलित मराठीतूनही उच्चारली. त्यावेळी त्यांना टाळ्यांची प्रचंड दाद मिळाली. हे बोलत असताना त्यांनी "यहा उपस्थित मेरे भाई- बहन, युवा कार्यकर्ता और मेरे भांजे और भांजियाॅ असा विशिष्ट उल्लेख भाषणाच्या प्रारंभी केला. या मागचं गमक ही त्यांनी सांगितलं की, मी जसा मध्यप्रदेशमध्ये मामा आहे तसा महाराष्ट्राचाही  मामा आहे हे आवर्जून त्यांनी सांगितले. त्याचप्र

MB NEWS- (क्षणचित्रे व फोटो फिचर)🏵️लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!*)

इमेज
  लोकनेत्याच्या अभिवादना साठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर! * क्षणचित्रे..... --------- • सकाळी ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं सुश्राव्य कीर्तनाचा उपस्थित हजारो लोकांनी लाभ घेतला. • लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध रितीने मुंडे भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. • वातावरणात  प्रचंड उकाडा असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला, त्यातही महिलांचा सहभाग लक्षवेधी • मुख्यमंत्री चौहान यांचे दुपारी 3.40 वा. मध्यप्रदेश शासनाच्या विशेष हेलिकॉप्टरने गडावर आगमन. पंकजाताई मुंडेंकडून स्वागत • गडावर येताच मुख्यमंत्र्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. • बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत केलेल्या सत्काराने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भारावून गेले महिलांनी दिलेला पट्टा त्यांनी कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत काढला नाही. • पंकजाताई मुंडे यांनी स्वतः  किर्तनात सहभाग घेऊन हरिनामात तल्लीन झाल्या तर दुपारी पंगतीत वाढपी होत महाप्रसादाचे वाटप केले. • हजारो नागरिकांनी, अबालवृध्द आणि महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपू

MB NEWS-*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*

इमेज
 गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       वंचित, उपेक्षित घटकांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या लोकांत मिसळण्याच्या व साधेपणाच्या वर्तनाचे नेहमीच प्रसंग  बघायला मिळतात. आज गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे  जेवण वाढताना "वाढप्याच्या" रूपात दिसून आल्या.         दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित स्मृतिदिन समारंभाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंडे प्रेमिंची अलोट गर्दी झाली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचीही या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. रामायणाचार्य ह.भ. प. रामराव महाराज ढोक यांचे यावेळी कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सभामंडपामध्ये उपस्थित जनसमुदायाच्या पंगती जेवायला बसल्या आणि या पंक्तीमध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतः हातात पदार्थ घेऊन पंगतीत वाढायला सुरुवात केली. उपस्थित सर्वांना आग्रहाने खाऊ घालत पंकजाताईं नी स्वतः आपल्या हाताने सर्वांना वाढले. पंकजाताईची ह

MB NEWS-काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे

इमेज
  काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....        काय मिळेल याची चिंता नको,सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू असा खंबीर आत्मविश्वास भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर आपल्या हजारो समर्थकांसमोर व्यक्त केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.        दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिदिन समारंभ झाला. यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती.याप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, ओबीसींची सुरक्षितता राहण्यासाठी ओबीसी आरक्षण हवे आहे. शिवराजसिह यांनी दिले, आपण का देऊ शकत नाही याचा महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे.मध्यप्रदेशचे अनुकरण केले पाहिजे. सगळेच विचारतात ताई, तुम्हाला काय मिळणार.मला काहीही नको.कोणत्याही पदाची लालसा नाही. मला पराभवा

MB NEWS- *संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान*

इमेज
 संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान   • ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          गोपीनाथ मुंडे म्हणजे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी परळीत गोपीनाथगडावर केले.           दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या परळी जवळील गोपीनाथ गड येथे आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या समारंभात संघर्ष सन्मान म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा "संघर्षदिन सन्मान" म्हणुन  प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर,ललित

MB NEWS-_गोपीनाथ गडावर अलोट गर्दी;ढोक महाराजांच्या किर्तनाने स्मृती समारंभ सुरू; हरिनामाचा गजर_

इमेज
  _गोपीनाथ गडावर अलोट गर्दी;ढोक महाराजांच्या किर्तनाने स्मृती समारंभ सुरू; हरिनामाचा गजर_    *गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*  परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....        दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे. स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास  रामायणाचार्य रामराम ढोक महाराज यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली.गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे.हरिनामाच्या गजराने गोपीनाथ गड दुमदुमून गेला आहे.         लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केले आहे , गोपीनाथराव मुंडे जाऊन 8 वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही, गोपीनाथराव मुंडे हे अनाथाचे नाथ होते, असे भावोद्गार हभप रामनाचार्य  रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन समारंभात ते बोलत होते. ढोक महाराज पुढे म्हणाले, गोपीनाथराव मुंडे आपल्यात नसले तरी माजीमंत्री पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या स्वरू

MB NEWS-मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे

इमेज
  मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...           गोपीनाथ गडावरुन  दरवेळी समाजातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा  सन्मान करण्यात येतो.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडलेला आहे.दरवर्षी गोपीनाथ गडावर एक संकल्प घेतला जातो आणि तो वर्षभर राबवला जातो.ओबीसींच्या आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात सुरू आहे.मध्यप्रदेश सरकारने मात्र ओबीसींना न्याय दिला आहे.यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर  सन्मान करुन एक व्यापक संदेश देण्यात येणार असल्याचे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्य कार्यक्रमापुर्वी एम बी न्यूज शी बोलताना सांगितले.               एका बाजूला महाराष्ट्रात ओबीसींना न्याय मिळावा यासाठी लढा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश या आपल्या राज्यात ओबीसींना न्याय देणारे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर येणार असुन त्यातून खुप मोठा संदेश जाणार आहे. गोपीनाथ गडाच्या व्यासपीठावर ने

MB NEWS-धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक

इमेज
धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक    परळी वैजनाथ, प्रतिनिधी           राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतले.       दिवंगत भाजपा नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त सकाळपासूनच गोपीनाथ गडावर मुंडेप्रेमींनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर गोपीनाथ गडावर येऊन स्मृतिदिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईहून हेलिकॉप्टरने येऊन गोपीनाथ गडावर दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अमरसिंह पंडित व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधित बातम्या  *गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक* *धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक* *मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन