MB NEWS-हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन होणार
हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन होणार स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन ह.भ.प.दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या किर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी उपसरपंच स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि.16 व 17 आँक्टोंबर रोजी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी पाशाकुशा एकादशी दि.27 आँक्टोंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली होती.त्यानिमित्ताने समाधी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्व.माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागात सर्वापरिचित व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व...