MB NEWS-सोमवार पासून अखंड शिवनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज परमरह्स पारायण सोहळ्यास सुरुवात

परळीत शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सोमवार पासून अखंड शिवनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज परमरह्स पारायण सोहळ्यास सुरुवात परळी वैजनाथ ता.२१ (बातमीदार) येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त गेल्या ४० वर्षापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही अखंड शिवनाम सप्ताह व शनैश्वर जन्मोत्सव २३ ते २९ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत अखंड शिवनाम सप्ताह श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात सोमवार (ता.२३) ते सोमवार (ता.३०) पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी (ता.२९) संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ...