पोस्ट्स

एप्रिल २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

इमेज
कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  ! • _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या