MB NEWS-वाढदिवस विशेष:शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते परळी- परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले.स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण,समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे राजेश गित्ते. कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपं...