पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-*एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

इमेज
  *एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी आगाराच्या वतीने तहसील कार्यालयवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चास जाहीर पाठिंबा देत एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केली    परळी आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीच्या संदर्भात तहसील कार्यालयावर आपल्या मुलाबाळांसह मोर्चा काढण्यात आला एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.    घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता दरम्यान पाठिंबा दिल्यानंतर मोर्चा संबोधित करताना प्रा विजय मुंडे म्हणाले की कोरोणा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांनी केलेली मागणी ही न्याय आहे ही सरकारने मान्य करावी या संपामुळे सामान्य नागरिकांचा सुद्धा पाठिंबा मिळत असून प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे खाजगी वाहन धारक प्रवाशांची आर्थिक लूट करत...

MB NEWS- चित्रपट समिक्षा:*"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*

इमेज
  *"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*            -   प्रा. डॉ. धम्मपाल एन. घुंबरे.             जय भीम चित्रपट पाहिला, संपूर्ण चित्रपटात जय भीम नावाचा कुठेही उल्लेख नाही, कोठेही वाक्य लिहिलेले नाही, जय भीम नावाची पाटी देखील नाही, मग काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की जय भीम हे नाव या चित्रपटाचे देण्यामागचे कारण काय आहे. त्याचे उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. थोडक्यात सांगायचे झाले तर, जय भीम हा चित्रपट तामिळनाडू येथील 1993 मधील झालेल्या आदिवासी कुटुंबातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारीत आहे. म्हणून या चित्रपटाचे नाव जय भीम आहे. जय भीम या नावाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर.... *जय भीम म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे.....* *जय भीम म्हणजे एक आशेचे किरण.....* *जय भीम म्हणजे क्रांतिकारी चळवळ.....* *जय भीम म्हणजे मुक्यांना बोलतं करणे.....* *जय भीम म्हणजे अन्याया विरुद्धचा हुंकार.....* *जय भीम म्हणजे दुबळ्यांना बळ देणे.....* *जय भीम म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे.....* *जय भीम म्हणजे अंधार...

MB NEWS-परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी

इमेज
  परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी परळी( प्रतिनिधी)- तालुक्यातील परळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी हेळसांड केली जाते.ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता इतर ठिकाणी रेफर केले जाते.ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण उपचार मिळण्याच्या आशेने परळी येथील रुग्णालयात धाव घेत असतात.मात्र, तेथेही त्यांना निराशेला सामोरे जावं लागतं.कारण, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळेल.परंतु,सर्व कर्मचारी, डॉक्टर , असूनदेखील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.तसेच, उपकार केल्यासारखे कर्मचारी रुग्णांशी वागतात . त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.ही होणारी हेळसांड थांबवावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी परळी काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई,गणपत कोरे,माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख,समुंदर खान पठाण, युवक अध्यक्ष धर्मराज खोसे,सय्यद आल्ताफ,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब देवकर, ॲड.शशीशेखर चौधरी, उपाध्यक्ष युवक काँग्रेस शेख आलीमभाई,शहर उपाध्यक्ष अशोक कांबळे,सय्यद सलीम, ओबीसी शहराध्यक्ष शेख ज...

MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांचे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट: "थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय"..........!*

इमेज
पंकजाताई मुंडे यांचेअर्थपूर्ण कलात्मक ट्विट : "थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय " ..........! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वाची छाप अनेक प्रसंगातुन दिसते. पंकजाताई मुंडे या आज दि.११ रोजी पाथर्डी दौऱ्यासाठी निघाल्या.पहाटेच अंधारात निघाल्या. प्रवासा दरम्यान त्यांनी सुंदर सूर्योदयाचे छायाचित्र टिपले व त्या छायाचित्राला अतिशय अर्थपूर्ण ओळी जोडत ते ट्विट केले आहे.यामधुनही राजकीय व्यक्तीमत्त्वा पलिकडच्या, कलात्मक - व्यासंगी व्यक्तिमत्वाची झलक बघायला मिळाली.पंकजाताई मुंडे यांचे  हे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट असुन 'थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय..........!' असा सुंदर मतितार्थ लक्षवेधी ठरणारा आहे.      भाजप नेत्या पंकजा मुंडे या जशा 'मासलिडर' आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वही वेळोवेळी दिसून येते.आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची मोहीनी लाखो समर्थकांवर आहेच. भाषणातील शेरोशायरी असो की काव्यपंक्तीचा वापर, म...

MB NEWS-*एसटी कामगारांचे परळीत जोरदार आंदोलन ; कुटुंबियांसह काढला मोर्चा (VIDEO NEWS)*

इमेज
  *एसटी कामगारांचे परळीत जोरदार आंदोलन ; कुटुंबियांसह काढला मोर्चा (VIDEO NEWS)* परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत जोरदार आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. परळीत आज एसटी कामगारांच्या कुटुंबियांसह मोर्चा काढण्यात आला.           एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी ,  पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी  एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आता शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या अनुषंगाने आज परळीत मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेध...

MB NEWS- *आजचा कोविड अहवाल: बीड जिल्हा आला एकेरीवर;आज जिल्ह्यात ०५पाॅझिटिव्ह_

इमेज
 *आजचा कोविड अहवाल:  बीड जिल्हा आला एकेरीवर; आज जिल्ह्यात ०५ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.तर बीड जिल्हा एकेरीवर आला आहे.जिल्ह्यात केवळ ५संख्या पाॅझिटिव्ह रुग्णांची आहे.                 आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ०५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे* _मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_

इमेज
 * देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे* _मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_ *मुंडे कुटूंबिय व नानभाऊ यांचे जुने ऋणानुबंध आजही कायम आहेत - अजय मुंडे* मुंबई....ता.9 केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील यशस्वीतांचा गौरव समारंभ मुंबईत येथील वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. या सोहळ्याला राज्यभरातून यशस्वी विध्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नानभाऊ पटोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे उपस्थित होते. देशाचे भविष्य युवकांच्या हातात आहे, युवकच देशाला दिशा दर्शक आहेत, युवकांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेत कठीण परिश्रम घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा असे यावेळी श्री. मुंडेंनी म्हटले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानभाऊ पटोले यांचा आदर - सत्कार बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय मुंडे यांनी केला व मुंडे कुटुंबीय व नानाभाऊ यांचे असलेले जुने ऋणानुबंध आजह...

MB NEWS-*⭕पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार*⭕

इमेज
  *⭕पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार*⭕ सोलापूर : पंढरपूर येथे कार्तिक यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात. या यात्रेच्या काळातील गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद - पंढरपूर, नांदेड - पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच गाडीत प्रवेश मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, ही गाडी १४ नोव्हेंबर २०२१ ला धावणार आहे. ही गाडी आदिलाबाद स्थानकावरून रविवार १४ नोव्हेंबर रोजी सुटणार असून सोमवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परत पंढरपूर स्थानकावरून ही गाडी ११.१० वाजता सुटणार असून नांदेड स्थानकावर रात्री ११.३० वाजता पोहोचणार आहे. नांदेड-पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस १८ नोव्हेंबरपासून धावणार आहे. या गाडीला जनरल ६, एसी थ्री टियर १, स्लिपर ११, ब्रेकयान २ असे एकूण २० कोचेस असणार आहेत. या गाडीचे आरक्षण १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला विशेष चार्ज आकारले जाणार अ...

MB NEWS-एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी सिआयटीयु संघटनेच्या वतीने निदर्शने

इमेज
  एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी सिआयटीयु संघटनेच्या वतीने निदर्शने परळी वै. ता.९ प्रतिनिधी      एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता सीआयटीयु संघटना परळीच्या बसस्थानका समोर निदर्शने करणार असल्याची माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे यांनी दिली आहे.       एसटी महामंडळाचे शासनात समावेश करावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामाउन घ्यावे या मागणीसाठी एसटी चे कर्मचारी आठवडया पासुन संपात सहभागी झाले आहेत. राज्यातील सर्वच एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या मागणी वरूण आजी माजी सत्ताधारी राजकारण करीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ व सरकारच्या विरोधात गुरूवारी (ता.11) सकाळी अकरा वाजता बसस्थानका समोर सिआयटियु निदर्शने करणार आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीसांना देण्यात आले आहे. या आंदोलनात सर्वच क्षेत्रातील कामगारांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन सिआयटियु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे व कोषाध्यक्ष कॉ किरण सावजी यांनी केले आहे.

MB NEWS-शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते

इमेज
  शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... शेतकरी गेली चार वर्ष निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.या वर्षी ही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात कर्ज घेऊन पेरणी केली . पिक चांगले येऊन उत्पादन चांगले होईल व आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक नुकसान झाले. .शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत व्हावी यासाठी अनुदान व २५टक्के पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे.शेतकरी यांना वाटले या रकमेतून आर्थिक हातभार लागेल.पण जेव्हा शेतकऱी बैंकेत गेले तेव्हा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून पिक कर्जाची रक्कम कपात करण्यात आली होती . आज राजेश गित्ते यांनी शेतकरी आणि विविध गावचे सरपंच यांना सोबत घेऊन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परळी वैजनाथचे मेनेजर यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ कपात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्या...

MB NEWS-एसटी कामगारांचे आंदोलन सुरूच ; परळीत मुंडण करुन कामगारांनी वेधले लक्ष 🕳️ प्रशासकीय कारवाई करण्यापेक्षा आम्हाला फासावर द्या - कामगारांच्या संतप्त भावना

इमेज
  एसटी कामगारांचे आंदोलन सुरूच ; परळीत मुंडण करुन कामगारांनी वेधले लक्ष  🕳️ प्रशासकीय कारवाई करण्यापेक्षा आम्हाला फासावर द्या - कामगारांच्या संतप्त भावना परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत मुंडण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.            एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आता शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या अ...

MB NEWS-"सबको काट डालेंगे" म्हणत चोरट्यांचा थरार.......! परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे:सिरसाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

इमेज
 "सबको काट डालेंगे" म्हणत चोरट्यांचा थरार.......! परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे:सिरसाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत   परळी वैजनाथ/प्रतिनिधी......        दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे.सिरसाळ्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडीची मोठी घटना दि.७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   सिरसाळा येथे घरफोडीत सुमारे अडिच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.           सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस...

MB NEWS-घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा

इमेज
  घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण  पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा  परळी (प्रतिनिधी) पंचायत समितीच्या सर्व्हेक्षण कमिटीकडून अंतिम यादीत अफरातफर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. असे करणाऱ्या पंचायत समितीच्या दोषी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून पात्र लाभार्थी कुटुंबांना घरकुल देऊन न्याय द्यावा असे तालुक्यातील मौजे करेवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणास बसण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे करेवाडी ता.परळी वै जि.बीड येथील घरकुलचा सर्वे करून ज्या लोकांना गांवामध्ये पडकी घरे पत्र्याचे सेड,कच्चे घर असलेले नागरिक १. अशोक आबासाहेब घाटुळ २.जनक आबासाहेब घाटुळ ३. भिवराव विठ्ठल कावळे ४. भागवत विठ्ठळ कावळे ५. वैजनाथ भागवत कावळे ६. उमेश भागवत कावळे इत्यादी लोकांचे सर्वे करून घरकुल योजनेतुन आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने नांव यादीतील नाव वगळले आण...

MB NEWS-माता न तू वैरीणी.............! दिड महिन्याच्या बाळाला दिले बेवारस सोडुन; बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये प्रकार उघडकीस

इमेज
  माता न तू वैरीणी.............! दिड महिन्याच्या बाळाला दिले बेवारस सोडुन; बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये प्रकार उघडकीस परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     नांदेड बेंगलोर एक्सप्रेस गाडी परळी रेल्वे स्थानकावर आज दिनांक आठ रोजी सकाळी आली असताना या गाडीच्या एका डब्यात एक ते दीड महिन्याचे वय असलेले बाळ सीटवर बेवारस सोडून देण्याचा प्रकार आढळून आला आहे. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या बाळावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.         याबाबत रेल्वे पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की आज दिनांक आठ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड बेंगलोर एक्सप्रेस गाडी परळी रेल्वे स्थानकावर आली असताना या गाडीच्या कोच नंबर एस २ मध्ये एकाच सीटवर सुमारे एक ते दीड महिने वयाचे एक बाळ बेवारस अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या बाळाच्या मातेचा तपास केला असता कोणीही आढळून आले नाही. या बाळाला सांभाळायचे नसल्याने अज्ञात मातेने हे बाळ बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली अ...