MB NEWS: *एमबीबीस पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा - अजय मुंडे*

*एमबीबीस पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा - अजय मुंडे* परळी (प्रतिनिधी) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने एमबीबीएस शिक्षणाच्या प्रवेशास पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली आहे. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी केले आहे. समाज कल्याण समितीचे सभापती कल्याण आबुज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून २०२०-२१ मध्ये एमबीबीएस प्रवेशास पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, परळीसह बीड जिल्ह्यातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जगमित्र ऑफिस व अजय...