
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या गेवराई.... गेवराई शहरातील शेतकरी गणेश जनार्धन मोटे ( वय 46 ) यांचा मृतदेह शनिवार ता. ८ रोजी शहरातील एका विहिरीत आढळून आला. त्यांनी बॅन्केच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असून, ते शुक्रवारी ता.7 रोजी पहाटे घरातून निघून गेले होते. शनिवार ता. ८ रोजी दुपारी एक वाजता गणेश मोटे यांचा मृतदेह गेवराई शहरा लगत असलेल्या उमेश येलदाळे यांच्या विहिरीत आढळून आला. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा करून, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.