कार्यकारणी जाहीर

स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)... शहरातील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव अतिशय भक्ती भावाने साजरा केला जातो. नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात येथील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवरात्री महोत्सवा दरम्यान स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक तसे...