MB NEWS-वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा*

*ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत लढा सुरूच राहणार* * वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा* लातूर । दिनांक १४ । स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील,आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडली.लातूर येथे पार पडलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर माजी मंत्री राम शिंदे,आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.नरेंद्र पवार,आ.रमेश कराड,आ.अभिमन्यू पवार,खा.सुधाकर शृंगारे,योगेश टिळेकर,सुधाकर भालेराव,गोविंद केंद्रे, पाशा पटेल,राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी ओबीसी...