पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धनंजय मुंडेंची विनंती केंद्राकडून मान्य

इमेज
आंबा, काजू, संत्रा यांसह ज्वारीचा पीकविमा दि. 04 व 5 डिसेंम्बर या दिवसात भरता येणार धनंजय मुंडेंची विनंती केंद्राकडून मान्य मुंबई (दि. 02) - रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या चार व पाच डिसेंम्बर या दोन दिवसात भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून 4 व 5 डिसेंम्बर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  रब्बी हंगामातील ज्वारी, तसेच आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे.  दरम्यान जे ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत आपला विम

परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त

इमेज
  परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त परळी .... प्रतिनिधी.... परळी चे सुपुत्र तथा लातूर येथील जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला हे तब्बल 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा लातूर येथे भव्यदिव्य असा निरोप समारंभ पार पडला. वकिली व्यवसायापासून आपल्या सेवेची सुरुवात करून 1995 मध्ये न्यायाधीश या पदावर रुजू होऊन मुंबई, संभाजीनगर, उल्हासनगर, नागपूर, नांदेड,अशा विविध ठिकाणी न्यायाधीश तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर आपल्या कार्याची एक आगळीवेगळी छाप टाकणारे परळीचे सुपुत्र कृष्ण गोपाल तोतला हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.लातूर येथील न्याय मंदिराच्या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचा निरोप समारंभ पार पडला.  त्यांच्या या निरोप समारंभाच्या वेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश,  वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व वकील संघाचे सदस्य, आणि न्याय मंदिरातील विविध पदावर काम करणारे क्लार्क व कर्मचारी यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत भावनिक अशा पार पडलेल्या या समारंभात अनेकांनी आपल्या भावन

दुःखद वार्ता:सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे निधन

इमेज
  सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे  निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी महाराष्ट्र विरर्शैव सभेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इट के गुरुजी यांच्या पत्नी सौ जयश्रीबाई  यांचे आज दिनांक शुक्रवार 1 डिसेंबर  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 67 वर्ष होते.  परळी शहरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा अत्यंत मनमिळावू स्वभाव म्हणून त्या प्रसिद्ध होत्या त्यांच्या पश्चात महादेव व प्रकाश ही दोन मुले सुना नातवंडे असा  परिवार आहे.सौ जयश्रीबाई इटके यांच्यावर उद्या दिनांक 2 डिसेंबर शनिवार रोजी कैलास धाम स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा.टि.पी.मुंडेंची परळीत पत्रकार परिषद : मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

इमेज
आवकाळी पावसाने उसतोड कामगारांचे प्रचंड नुकसान; प्रत्येकी 25 हजारांची अर्थिक मदत द्या-प्रा.टी.पी.मुंडे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       दोन-चार दिवसापासून जी गारपीट आणि अवकाळी पाऊस चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नुकसान ऊसतोड कामगारांचे झाले आहे. जो ऊसतोड कामगार महाराष्ट्रामध्ये गेला आहे. या गारपिटीमुळे अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोबत असलेले उपजीविकेच्या सामान खराब झाले आहे. ऊसतोड कामगार व त्यांची मुले बाळे आजारी पडली आहेत.आता त्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी खायला अन्न नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व आजारी पडलेल्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही म्हणून सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी ताबडतोब दोन कोयत्याला (जोडीला) कारखान्यानतर्फे २५ हजाराची  आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रा.टि.पी.मुंडे यांनी केली आहे.             राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी  संबंधित  सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदेश द्यावा. अनेक कारखान्यांवरून ऊसतोड कामगारांचे फोन येत आहेत. उसत

डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार

इमेज
परळी-सिरसाळा दुहेरी रस्त्यावर एका बाजूने होणार सुरळीत वाहतूक खा.प्रितमताई मुंडे यांनी दिल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना ; डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार बीड। दि. ०१ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ या मार्गावर परळी ते सिरसाळा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे वाहतूक धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या परिसरातील नागरिक आणि प्रवाश्यांच्या तक्रारींची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक घेऊन रस्त्याच्या एका बाजूने वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या. परळी-सिरसाळा मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे एकाचवेळी खोदकाम करण्यात आल्याने यया मार्गावरील वाहतुकीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या मार्गाहुन प्रवास करणारे वाहतूकधारक आणि प्रवासी रस्त्याच्या हे दुरावस्थेमुळे त्रस्त असल्याची बाब समजताच खा.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाची बैठक बोलावली आणि रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी तात्काळ कार्

श्रीविठ्ठल समानतेचा,समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे

इमेज
  श्रीविठ्ठल समानतेचा, समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे  पुणे(प्रतिनिधी) भगवंताच्या अनेक अवतारांचे वर्णन असले तरी समचरण व समदृष्टी असलेला देव ,केवळ भक्तांचे कैवारासाठी अवतार धारण करतो.श्रीविठ्ठलाचे  रुप सर्वांना आकर्षित करुन घेते असे प्रतिपादन संतवाड़्मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड . दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले. मुळशी खोऱ्यातील संतनगरी पिरंगुट येथे काकड आरती सांगता निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाची प्रारंभीची कीर्तन सेवा श्री दत्तात्रेय महाराज यांनी केली.या कीर्तनास ह.भ.प.बबन महाराज,ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज आळंदी,ह.भ.प.केशव महाराज भेगडे,ह.भ.प. राजेंद्र गोडांबे ,ह.भ.प गणेश महाराज बोडके,तसेच मृदंगाचार्य ह.भ.प सारंग महाराज क्षीरसागर यांनी साथ  दिली.यावेळी प्राचार्य मनोहर भालके, समाजसेवक रामचंद्र देवकर,पिरंगुट येथील श्री चांगदेव पवळे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रभागी असलेले श्री ज्ञानेश्वर पवळे,श्री तुषार पवळे, पहिल्या दिवशी चे यजमान श्री नारायण सातव, श्री दशरथ मारोती पवळे,श्री कैलास पवळे ,श्री राजाभाऊ

■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार

इमेज
■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार परळी वैजनाथ,प्रतिनिधी..        बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर विभूती,अध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान नवगण राजुरी येथील प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून किर्तन प्रबोधन या विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल परळी वैजनाथ येथे स्वामीजींचा ह्रदय सत्कार करण्यात आला.           वै.ह.भ.प. रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कथा किर्तन महोत्सवात प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांची किर्तनसेवा झाली.या  महोत्सवातील संपुर्ण किर्तने व कथा याचे 'झी टॉकीज 'च्या 'मनमंदिरा' कार्यक्रमात प्रसारण होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे या महोत्सवाचे चित्रिकरण झाले. महोत्सवातील समारोपीय सत्रात  ह.भ.प.श्री.अमृताश्रम स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.           यावेळी  आचार्य अमृताश्रमस्वामी महाराज  यांना महारा

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केला ह्रदय सत्कार

इमेज
प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार: पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केला ह्रदय सत्कार परळी वैजनाथ,प्रतिनिधी..        बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर विभूती,अध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान नवगण राजुरी येथील प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून किर्तन प्रबोधन या विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल परळी वैजनाथ येथे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामीजींचा ह्रदय सत्कार केला.         प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) परळी वैजनाथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते.पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामीजींची आवर्जून भेट घेत आशिर्वाद घेतले. त्याचबरोबर यावेळी  आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज  यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल  ह्रदय सत्कार केला.

डॉ. राजेश इंगोले,प्रमोद आडसुळे, रानबा गायकवाड निर्मित 'राधा' लघुपटाचा गौरव

इमेज
  डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'राधा लघुपट' इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट कोलकाता   महोत्सवात सन्मानित डॉ. राजेश इंगोले,प्रमोद आडसुळे, रानबा गायकवाड निर्मित 'राधा' लघुपटाचा गौरव  परळी प्रतिनिधी    पश्चिम बंगाल येथील सिनेरत्न तथा भारतीय समांतर  सिनेमाचे जनक सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांच्या भूमीत अर्थातच कोलकाता येथे इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला.पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील हावडा सरत सदन येथे संपन्न झालेल्या इंडिया स्क्रीन प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रख्यात पत्रकार प्रमोद अडसुळे लिखित,प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले निर्मित, जेष्ठ साहित्यिक पटकथाकार रानबा गायकवाड संवादित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'राधा' या लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपट सन्मान प्राप्त झाला आहे.       सिने-नाटय अभिनेता-लेखक दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेल्या "राधा" या   लघुचित्रपटास इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (ISP 2023)  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवात

इमेज
  येणाऱ्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली नंबर एकचा पक्ष करुया - धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवात कर्जत (रायगड) दि. ३० नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या वैचारिक मंथनातून येणाऱ्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली नंबर एकचा पक्ष करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.          मित्र कोण... शत्रू कोण हे गणित कळले नाही... ही कविता बोलत धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही लोकांकडून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगितले जायचे मग ती पक्षातील असो, राज्यातील... मात्र जेव्हा पक्षातील लोकशाही अजितदादा पवार यांनी समोर आणली त्यावेळी दादांना खलनायक ठरवण्यात आले याबद्दल धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.         प्रत्येक भूमिका घेतल्या गेल्या त्यावेळी खलनायक कोण तर अजितदादा ठरले गेले. स्वतः च्या नेतृत्वासाठी अनेक निर्णय घेतले गेले त्यावेळी अजितदादा चांगले होते परंतु पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेतला तर ते खलनायक झाले आणि आज कोणपण टिका करत आहेत. काहींना दादांची जागा मिळवल्याचा भ

आ. कैलास गोरंट्याल यांची भेट

इमेज
  दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद: आ. कैलास गोरंट्याल यांची भेट ...............   जालना/नांदेड :दि.29 संतोष कुलकर्णी            परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते  दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून जालना शहरातील गांधी चौकात उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दिवसभरामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी वकील संघाने यांची भेट घेऊन ब्राह्मण संघर्ष समितीच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.  महाराष्ट्र राज्यातील समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत आहे. या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चे काढून आंदोलनही केले आहे. आंदोलन करूनही राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा न केल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी मं

वैद्यनाथ भक्ती मंडळाचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी

इमेज
  वैद्यनाथ भक्ती मंडळाचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी द्विवर्षपूर्तीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमासह विविध कार्यक्रम; परळीकरांची मोठी उपस्थिती परळी (प्रतिनिधी) धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने परळी वैजनाथ येथील औद्योगीक वसाहत सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. दि.२६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हरे कृष्णा (इस्कॉन) यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम, प्रभू वैद्यनाथ,  पंढरीचा विठ्ठल पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व भगव्या ध्वजाचे पुजन करण्यात आले. त्याचबरोबर २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिवस असल्याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या स्थापनेस दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमास परळी शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या

मराठा आरक्षणासाठी केली होती आत्महत्या

इमेज
 मोरे कुटुंबीयास शासनाची दहा लाखांची मदत पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून तातडीने मदत कुटुंबियांना सुपूर्द परळी वैद्यनाथ (दि. 28) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केलेल्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोवर्धन (हि.) येथील तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने 10 लाखांची मदत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून तातडीने मंजूर करण्यात आली असून, या रकमेचा धनादेश संबंधित कुटुंबास आज प्रशासनाच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. परळी तालुक्यातील गोवर्धन गावच्या गंगाभीषण मोरे या तरुणाने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केली होती. मोरे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.  आज मोरे कुटुंबाला 10 लाखांची मदत धनादेशाच्या स्वरूपात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ चाचा पौळ, दत्ता मोरे, गणेश पौळ, भागावत रासवे, बीबीशन जाधव, वैजनाथ जाधव, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, यांसह मयत मोरे यांच्या पत्नी श्रीमती कविता मोर

परळी तहसिल कार्यालय समोर विविध प्रश्नांवर माकपची गुरुवारी निदर्शने

इमेज
  परळीत विविध प्रश्नांवर माकपची गुरुवारी निदर्शने  परळी / प्रतिनिधी       राज्यातील शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, युवक व कामगारांच्या प्रश्नावर गुरुवारी (ता.३०) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहे.       राज्यातील शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, युवक व कामगारांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालया समोर २८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत माकपच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणुन गुरुवारी (ता.३०) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी रहावे असे आवाहन माकपचे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ परमेश्वर गीत्ते, कॉ रुस्तुम माने, कॉ पप्पु देशमुख, कॉ सुदाम शिंदे, कॉ किरण सावजी, कॉ बालासाहेब कडभाने, कॉ विशाल देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

इमेज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल  2024 रेाजी घेण्यात  येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते  16  डिसेंबर 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाच्या परीक्षांची तारीख पुढीलप्रमाणे राहणार आहे: महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024  -  16 जुन  2024 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024  -  29 सप्टेंबर  2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग  पूर्व परीक्षा 2024  -  17 मार्च  2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग  मुख्य  परीक्षा 2024 -  27 जुलै 2024 सहायक मोटार वाहन निरिक्षक  मुख्य परीक्षा 2024 - 26 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्र गट –क सेवा म

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ

इमेज
 ‘ शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ   बीड दि. 27, (जिमाका) : परळी वैद्यनाथ शहरात ‘शासन आपल्या दारी’ ची जय्यत तयारी सुरू असून आज कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.   जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’  ही विशेष मोहीम राज्यभर राबविली जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार असून आज जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमास्थळी जाऊन पाहणी दौरा केला.   या ठिकाणी उभारण्यात  येणारा सभामंडप, स्टॉल्स,  लाभार्थी यांची व्यवस्था या सर्वांबद्दल सर्वंकष चौकशी केली.‌ कामाचा वेग वाढवण्याचे आदेश संबंधितांना दिले.   या पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वेंकटेश मुंडे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, नायब तहसीलदार बी. एल. रुपनार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

इमेज
  परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण बीड दि. 27, (जिमाका) :  परळी वैद्यनाथ शहरात  शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज झाले.        बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परळी वैद्यनाथ शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय  विश्रामगृहाचे आज जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.             यावेळी उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बी. एल. रूपनार, कंत्राटदार, अधिकारी ,कर्मचारी  उपस्थित होते.  परळी वैद्यनाथ येथे ज्योतिर्लिंग असून  गणमान्य व्यक्तींचा सतत दौरा असतो. यासह थर्मल पॉवर, विविध शासकीय कार्यालय असल्यामुळे येथील एकाच शासकीय विश्रामगृहावर ताण पडत होता. नवीन शासकीय विश्रामगृह उभारल्यामुळे हा ताण आता कमी होणार असून अद्यावत सुविधांसह हे विश्रामगृह बांधण्यात आले आहे.  या ठिकाणी येणाऱ्या विशेष अतिथींसाठी 2 विश्राम कक्ष आणि सामान्य 5

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  खा.डाॅ. प्रितम मुंडे यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बीड, प्रतिनिधी...        बीड लोकसभा मतदारसंघाच्या विक्रमादित्य लोकप्रिय खा.डाॅ. प्रितम  मुंडे यांच्या  माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासात्मक घोडदौड सुरु आहे. त्या अनुषंगानेच जिल्ह्य़ात विविध ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांचे भूमिपूजन व तयार झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण दि.२७ व २८ रोजी खा.डाॅ. प्रितम  मुंडे यांच्या शुभहस्ते  होणार आहे.         भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विविध विकासात्मक कामांची अखंडित श्रृंखला सुरु आहे. विविध विकासकामांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांची अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक नवीन कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. यापैकी तालुका हद्द केज ते टोकेवाडी-खडकी-कान्होबाचीवाडी- बुरुसदरा-सरकारखोरी- वडवणी-राम्मा 548 बी. बहेगव्हाण राम्मा 561 इजिमा 67 चिंचोली रोडजवळ. कामाचे नाव : राम्मा ५६१-वडवणी ते चिंचोटी-हरिचंद्र पिंपरी तांडा-चिं

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील ठराव शासन दरबारी

इमेज
  पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक : संदीप काळे   ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील ठराव शासन दरबारी   मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मागण्या मान्य करण्याचे आश्वासन   मुंबई, ता. २६ : बारामती येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य शिखर अधिवेशनातील ठराव संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सादर केले. यावेळी या ठरावांवर शासन सकारात्मक असून लवकरच या संदर्भात निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार मागण्यांना घेऊन गंभीर असल्याचे सांगत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठीशी असल्याचे सांगितले.  १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी बारामती येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन राज्यतील सर्व प्रमुख पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, श्रीराम पवार, जयश्री खाडिलकर, प्रकाश पोहरे, संजय आवटे, चं

परळीतील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण

इमेज
  परळीतील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण परळी वैद्यनाथ (दि. 26) - परळी वैद्यनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी सकाळी 11.00 वा. राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न होणार असुन, या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे विशेष अतिथी विश्रामगृह उभारण्यात आले असून या ठिकाणी येणाऱ्या विशेष अतिथींसाठी विश्राम कक्षा सह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे विश्रामगृह परळी वैद्यनाथ शहराची शोभा वाढवणारे ठरणार आहे. या कार्यक्रमास राज्यसभा सदस्या खा.सौ.राजनीताई पाटील, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.ऍड.लक्ष्मण पवार, आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीर

शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची आज जयंती

इमेज
  शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची आज जयंती परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे  पालखीचे आगमन; भाटिया परिवाराकडून स्वागत परळी (प्रतिनिधी) शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची येत्या 27 नोव्हेंबर रोजी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने नांदेड ते बिदर या विशेष रेल्वे गाडीचे शासनाच्या वतीने दरवर्षी नियोजन करण्यात येते. रविवार, दि.26 ऑक्टोबर रोजी ही जयंती विशेष गाडी परळी वैजनाथ येथे आली असता भाटिया परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने सर्वांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली. याच वेळेस गाडीत असलेले सिख धर्माचे धर्मगुरू यांचा सत्कार करण्यात आला.        सिख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी नांदेड ते बीदर असा पालखी सोहळा संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा पारंपरिक सोहळा संपन्न होत असून रविवारी या पालखीचे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन येथे आगमन झाले. पालखीचे आगमन होताच परळीतील भाटिया परिवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या विशेष रेल्वे गाडीतील सर्व प्रवासी भक्त बांधवांसाठी लंगरची व्य