MB NEWS-*कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन* *कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा-अजितदादा पवार* *जयस्तंभ शौर्य, समता व न्यायाची प्रेरणा देत राहील; इथला सर्वंकष विकास करणार - धनंजय मुंडे*
*कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन* *कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा-अजितदादा पवार* *जयस्तंभ शौर्य, समता व न्यायाची प्रेरणा देत राहील; इथला सर्वंकष विकास करणार - धनंजय मुंडे* पुणे, दि.१: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास आज पहाटे अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ऐतिहासिक जयस्तंभ हा शौर्य, समता व न्यायाचे प्रतीक असून जयस्तंभ व परिसराचा सर्वंकष विकास करण्याची जबाबदारी आपल्या विभागाने घेतली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांसह मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व जनतेला न...