पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाशिवरात्री विशेष लेख: वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे

इमेज
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे ------------------------------------ [ॲड.दत्तात्रय आंधळे ]       श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने  प्रशिध्द आहे .येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय. .भारताच्या  नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ  भास्कराचार्य [इ.स.११४४-१२२३]यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे ग्रंथ  लिहले आहेत.त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे. "पुरीरक्षशां देवकन्याsथ कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//"भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी,कांची,शैलपर्वतआणि परळीवरुन