MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व* 🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_
*ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व* 🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबेवेस भागातील श्री. काळाराम मंदिर येथे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह उभारणी झालेले आहे. त्याचबरोबर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा श्री. काळाराम ...