पोस्ट्स

औरंगाबाद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद गाडीच्या वेळापत्रकात काहीसा बदल

इमेज
  ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद  गाडीच्या वेळा पत्रकात काहीसा बदल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या औरंगाबाद-हैद्राबाद या रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.      दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या  दि 12 एप्रिल च्या पत्रकान्वये ट्रॅफिक ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक  दि 13 ते 30 एप्रिल या कालावधीत चिकलठाणा औरंगाबाद विभाग - नांदेड विभागा दरम्यान प्रत्येक एक दिवस आड म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेसची वेळ 2 तास 40 मिनिट उशीरा होणार आहे. सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी ही रेल्वे गाडी औरंगाबाद या रेल्वे स्थानकावरून 18.55 वा सुटणार आहे.या रेल्वे गाडीची नियोजित प्रस्थान होण्याची वेळ 16.15 वा आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी याबाबत माहिती दिली आहे.

MB NEWS-लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात

इमेज
  लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात औरंगाबाद : विवाह जुळणे सध्या आवघड बाब बनली आहे.मुली मिळत नसल्याने उपवर मुलांचे पालक खोलवर विचार न करता जमून आलेल्या स्थळाची घाईघाईने निवड करुन लग्न लावून मोकळे होतात.परंतु यातुन आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे.  सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून चालु होती फसवाफसवी.या फसवाफसवी करणाऱ्या मुलीला  दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खुलताबाद तालुक्यातील राजेश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते. २९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताब

MB NEWS-पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात  पाटोदा , आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.  श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे  त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे.