MB NEWS:बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड परळी (प्रतिनिधी.) महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतालाच नाही तर या जगातील प्रत्येक माणसाला दिशा देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इंदपवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई फुलचंद मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. टाकणखार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, ब्रह्मानंद कांबळे, नवनाथ जोगदंड, भागवत मुंडे, प्रा. दशरथ रोडे, फुलचंद मुंडे, अभिमान मुंडे, ह. भ. प. भागवत मुंडे, संपत मुंडे, उत्तम रोडे, सोपान जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतले परंतु बाबासाहेबांनी पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाचा अ...