MB NEWS:केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन

 केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - देशात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न पेटत असताना केंद्र शासनाने कांदा पिक आवश्यक वस्तू कायद्यातून वगळून शेतकऱ्यांवर आन्याय केला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम स्वरुपी उठवावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने खासदार निवासस्थानासमोर आंदोलन केले.

       कांदा निर्यात बंदी व कांदा पिकाला आवश्यक वस्तू कायदा यातून वगळने या निर्णयाच्या विरोधात  शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले.यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास सोळंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व लोकसभेत खासदारांनी आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली.

   या आंदोलनात अशोकराव नरवडे  ( बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना ) कैलास सोळंके (बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी ) अॅड राहुल सोळंके (शेतकरी संघटना परळी तालुका अध्यक्ष)  छञभुज नरसाळे शिवप्रसादअप्पा खेञी  धनंजय मिसाळ सुभाष सोळंके कबीर बनसोडे राहुल सोळंके दादा घुमरे अंनतराव यादव आदी सहभागी झाले होते . 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !