MB NEWS- *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. या यात्रेची बीड जिल्ह्यातील सुरुवात परळी पासुन झाली.परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनापासून ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान श्री क्षेत्र सुदुंबरे येथून खासदार रामदास तडस, अशोक व्यवहारे, डाॅ.कर्डिले,श्री गजनान शेलार यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेची सुरुवात झाली असून ही रथ यात्रा आज शुक्रवारी (दि.१७) परळीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले. या रथयात्रेतील संताजी जगनाडे महा...