MB NEWS:आवकाळी गारपीट : विज पडून गाय व बैल दगावले
.jpeg)
आवकाळी गारपीट : विज पडून गाय व बैल दगावले केज :- केज तालुक्यात आज दुपारी ३:०० वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर देवगाव आणि मांगवडगाव येथे दोन ठिकाणी वीज पडून गाय व बैल दगावले आहेत. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* दि. ८ एप्रिल रोजी दुपारी २:३० ते ३:३० वा सुमारास केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला. केज तालुक्यातील नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला तसेच मांगवडगाव येथेही वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे. ---------------------------------...