MB NEWS:आता हद्दच झाली......! महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा मंदिर परिसरातील वीज गुल: भाविकांची प्रचंड कुचंबना
.jpeg)
आता हद्दच झाली......! महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा मंदिर परिसरातील वीज गुल: भाविकांची प्रचंड कुचंबना परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी शहरातील वीज खंडित राहणे हे नेहमीचेच झालेले आहे परंतु निदान महाशिवरात्री सारख्या पर्वकाळात तरी अखंडित वीज असावी अशी सर्वसाधारणपणे सामान्य जनतेची अपेक्षा असते. परंतु नेमके याच दिवशी आणि विशेष म्हणजे जगमित्र नागा मंदिर हे वैजनाथ मंदिर परिसर या भागातील वीज तब्बल दीड तास गुल होण्याच्या घटनेने आता मात्र हद्द झाली असे म्हणण्यची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री हा अतिशय अस्मितेचा व पुरातन परंपरेचा महोत्सव असतो. ज्याप्रमाणे सर्वसामान्य भाविक व परळीकर म्हणून यापर्वकाळाचा अभिमान प्रत्येकालाच असतो. त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनाही असावा अशी अपेक्षा असते.महाशिवरात्रीच्या अनुषंगाने पूर्वतयारीही करण्यात येते. यामध्ये अत्यावश्यक असणारा वीज पुरवठ्याच्या बाबतीतला मुद्दा प्रक...