पोस्ट्स

आक्रमक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन

इमेज
  महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी..          महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केला होता. आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या "बेशरमपणाचा" कार्यकर्त्यांनी निषेध केला असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.          महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात असा आरोप पत्रकार परिषदेत  काॅंग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई  यांनी केला होता.परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना दे

MB NEWS-शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा

इमेज
  शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा मुंबई..... शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. आमचे हिंदुत्व हे शेंडी- जानव्याचे नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून खासदार राऊत यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा अहमदनगरमध्ये राऊत यांच्या विरुद्ध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण संघाने दिला होता. आता खासदार राऊत यांनी माफी मागितली असुन हा ब्राह्मण समाज एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी यांनी दिली. Video          केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर नाभिक समाजाच्या नाराजीचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला. "आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अहमदगरमध्ये त्यांच्याविरूदध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात ये