पोस्ट्स

ऑक्टोबर १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी

इमेज
  परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी    परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        येथील मोंढा विभागातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेला आग लागून धुराचे लोट दिसून येत होते. आज सकाळच्या सुमारास महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून धुराचे लोट नागरिकांना दिसून आले त्यामुळे बँक आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे असे लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ हि बाब परळीचे अग्निशमन दल व पोलिसांना कळवली दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून बँकेत काय काय जळाले आहे याची सखोल तपासणी सध्या सुरू आहे       परळी येथील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आर्य समाज मंदिर जवळ असलेल्या शाखेत शनिवार दि 22 रोजी सकाळी अचानक अचानक भीषण आग लागली.         आगीचे लोट दिसताच स्थानिक नागतिकांनी परळी परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास याची कल्पना दिली असता अग्निशमन दलाने आग आटोकात आणायचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली असून सदरील ठिकाण संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून 1 अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.        प्रथमदर्शी ही आग शाॅर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत बँकेचे सर्व रे

MB NEWS-विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी

इमेज
  विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी   परळी वैजनाथ, प्रतिनिधी... विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ तर्फे आज दि. २१/१०/२०२२ *वसुबारस अथवा गोवत्स द्वादशीचा* कार्यक्रम विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ सत्संग प्रमुख श्री रविंद्रजी वेताळ व मातृशक्ती प्रखंड संयोजिका सौ. अपर्णाताई वेताळ यांनी गोमातेला व वासरास साडी चोळीचा आहेर अर्पण केला. वसुबारस कार्यक्रमाचे धार्मिक महत्त्व विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख ह. भ. प. श्री रविंद्रजी वेताळ यांनी विषद केले तर वैद्यानिक महत्त्व प्रसिद्ध फोटोग्राफर व गोप्रेमी श्री सुनीलजी फुलारी यांनी विस्तृतपणे सांगितले. जास्तीत जास्त प्रमाणात गोउत्पाद (दुध, दही, तुप, धूप, गोवरी, सेंद्रिय शेतीतील उत्पादन) वापरून सर्वसामान्य जनतेने गोसेवा व गोसंवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद परळी-वैद्यनाथ शहर मंत्री श्री वैभवजी धोंड यांनी केले. प्रसिद्ध गोपालक श्री. सचिनजी येवतेकर यांनी गोसेवेचे अनुभव व गोमुत्र अर्काचा मानवी आरोग्यावर होणारा चांगला परिणा

MB NEWS-सरकार आपलं, विश्वास ठेवा* *खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास

इमेज
  प्रशासनाला सोबत घेवून केज तालुक्यात खासदार शेतकर्‍यांच्या बांधावर...विमा कंपन्यांनी मनमानी करू नये, सरकार आपलं,  विश्वास ठेवा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास बीड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला असताना जिल्ह्याच्या खा. डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे ह्या मात्र पडत्या पावसात शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करताना दिसतात. एवढेच नाही तर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याची मोहिमही त्यांनी हाती घेतली. काल केज तालुक्यात होळ, लाडेगाव, ढाकेफळ परिसरात नुकसानीची पहाणी करताना शेताचे तळे झाल्याचे याचि देहि, याचि डोळा त्यांना दिसले. लोकांच्या डोळ्यातील आश्रू बरंच काही बोलून जात होते. अशा संकटात खासदारांनी मात्र सरकार आपलं आहे, निश्चित मदत करील. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान विमा कंपन्यांच्या विरोधात खासदारांचा संताप दिसुन आला. बीड जिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. सर्व तालुक्यात प्रचंड पडत असलेल्या पावसाने खरीपाचं कुठलंही

MB NEWS-शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा

इमेज
  शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व विमा लागू करावा अशी मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे. परळी शहर व तालुक्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना गुरुवार दि 20 रोजी अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत.यातच गाढे पिपळगाव येथील 25 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जात दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही वीज पडून मृत्यू झाले. सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक

MB NEWS-पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी _तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला केल्या सूचना_ परळी वैजनाथ ।दिनांक २१। गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.    काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात  ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित होते, त्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने शास

MB NEWS-सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार

इमेज
  सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार आज शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज 100 मिनिटे लेट होणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी गुरुवारी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटली सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 21 रोजी देखील ही एक्सप्रेस 100 मिनिटे उशिरा नांदेड येथून सुटणार असून या गाडीची नियमित वेळ सायंकाळी 6:20 असून ती आज सायंकाळी 8 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MB NEWS-77 वर्षीय शेतकऱ्याने सांगितले आपल्या आयुष्यात एवढा पाऊस बघितला नाही

इमेज
  विदारक परिस्थिती: गेल्यावर्षीचं 100 अन् यंदाचे कट्टे 150 कट्टे सोयाबीन पाण्यात ;कोंबड्या मेल्या:अख्या घरात पाणीच पाणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....      परतीच्या पावसाने हाकार मांडला असून शेती शेतीतील पिके रानातले घर पाळलेले पशु या सर्वच घटकांवर या पावसाने वरवंटा फिरविण्याची चित्र निर्माण झाले आहे काल परळी तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत उरलंसुरलं सर्व खतम करून टाकला आहे अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकरी आपापली व्यथा मांडताना दिसत आहे यातच बेलंबा येथील वय वर्ष 77 असलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की आपल्या आयुष्यात आपण एवढा पाऊस पाहिलेला नाही रानातील घर जमिनीपासून तीन फूट उंचावर बांधलेले आहे या घरात असलेले गेल्या वर्षीचे व यावर्षीचे सगळे सोयाबीन पाण्यात गेले आखाड्यावर असलेल्या पाळलेल्या कोंबड्या मेल्या सगळ्या घरात पाणीच पाणी झालं अशा परिस्थितीत नेमकं करावं काय असा खिन्न प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.         प्रभू धर्म गिरी रा.बेलंबा यांचे घरात कालच्या पावसाचे पाणी घुसल्याने यावर्षी झालेले 150 कट्टे सोयाबीन व मागच्या वर्षीचे 100 कट्टे सोयाबीन घरातच होते. ते सर्व पाण्य

MB NEWS-स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस

इमेज
  स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस -------------------- परळी वै. (प्रतिनिधी):- परळी शहरातील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेतील कर्मचारी व पिग्मी एजंटाना दिवाळी बोनस रोखीने दिला आहे. यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी दिली.         परळी शहरातील छोटे व किरकोळ व्यापार्‍यांचा आर्थीक कणा म्हणुन उदयास येत असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्मचारी व पिग्मी एजंटांना नगदी स्वरूपात दिवाळीनिमित्त बोनस दिला आहे. पतसंस्थेनी कोरोना काळात पिग्मी एजंटांना दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य दिले होते. पतसंस्थेनी कर्जदार ग्राहकांचा अपघाती विमाही सुरू केला आहे. पतसंस्था शहरातील छोटया व्यापार्‍यांना सहज व तात्काळ कर्ज देण्यात तत्पर आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासीक बैठकीत पिग्मी एजंटांना प्रत्येकी दोन हजार तर कर्मचार्‍यांना तीन हजार रूपये याप्रमाणे दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  या बैठकीस सचिव लक्

MB NEWS-विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड

इमेज
विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड  परळी (प्रतिनिधी) तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.  मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे परळी तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये व काल खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन शंभर टक्के गेलं आहे एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असून क

MB NEWS- प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना

इमेज
 प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी  सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. परळी तालुक्यातील मोजे संगम येथे रात्री विजेच्या कडकडाटासह अतिशय जोरदार पावसाचा कहर झाला. प्रा.टी.पी.मुंडे (सर )यांनी संगम येथे पुलाची, घरांची तसेच शेतातील पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. संगम वस्ती व गावाला जोडणाऱ्या पुलावरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटला असून गावातील घरात पाणी शिरले आहे त्यामुळे घरात ठेवलेले सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिके भिजवून गेली आहेत. पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.    संगम वागबेट येथील तलाठी श्रीमती गोरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पुलाची घरात भिजलेले पिके आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तसेच सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांशी तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना धीर दिला.   रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे य

MB NEWS-दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: दिवाळी उत्सवाच्या काळात घराला कुलूप लावून गावी जात असताना मौलवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शेजाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी, संशयीत रित्या कोणी आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केले आहे. सद्या दिपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खुप गर्दी वाढलेली आहे. त्यांचा फायदा चोर, गुन्हेगार घेतात. त्यामुळे नागरीकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना व खरेदी करतांना आपले दागिने, पर्स, पॉकेट, बॅगा संभाळाव्यात. दिपावलीमुळे बँकात गर्दी असते. घर बंद करून गावी जातांना घरात सोने, चांदी, पैसे ठेवू नयेत व गावी जातांना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. दिपावली उत्सव दरम्यान काही लोक सोने उजळून देतो असे म्हणून घरी येतात व उजळण्याच्या बहाण्याने खरे सोने घेवून पोबारा करतात. अशा व्यक्तीना घरात येऊ देऊ नये व असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे किंवा शेजाऱ्याची मदत घ्यावी, असेही पो.नि. सुरेश चाटे   यांनी आवाहन केले आहे.

MB NEWS-पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश

इमेज
  पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश परळी शहर व तालुक्यात गुरुवार दि 20 रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावत अक्षरशः दाणादान उडविली. विजेच्या कडकडाटासह अनेक तास धुंवादार पाऊस झाल्याने शहर व तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले.परळी तालुक्यातील गाढे पीपळगाव येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्षीय युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला असून परळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवीत शोध कार्य सुरू केले.वाहून गेलेल्या अक्षय आरगडे याचा मृत देह आढळून आला आहे.सध्या अनेक ठिकाणी नदी,ओढे याला पूर आला असून यातुन कोणीही प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. ● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...... ■ *उरलं, सुरलं सगळं ऽऽऽऽऽऽऽ संपलं......!* ■ _All the rest, everything is over...!_ *#mbnews #subscribe #like #share #comments*

MB NEWS-उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा

इमेज
उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           संत नामदेवरायांच्या समकालीन असलेले संत जगमित्रनागा महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनांक 21 रोजी असून समाधी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.    वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संत मांदियाळीतील प्रमुख संत असलेल्या व संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत जगमित्रनागा महाराज यांची परळी येथे संजीवन समाधी आहे. संत जगमित्रनागा महाराज यांचा समाधी सोहळा शुक्रवार दिनांक 21 रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा वाजता गुलाल उधळून समाधी सोहळा साजरा केला जाईल. हभप प्रा.डॉ. शाम महाराज नेरकर यांचे पूजेचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ वितरण व महापूजा होणार आहे. या समाधी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत जगमित्र नागा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.   दरम्यान श्री सुधाकर महाराज श्रीरंग मद्रेवार लातूरकर चापोली यांच्या तर्फे समाधी सोहळा उत्सव महापूजा होणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ,नामदेव गाथा या ग्रंथाचे वाटप होणार आहे. तसेच श्री ह भ प सुधाकर श

MB NEWS-कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

इमेज
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश  मुंबई, दि.२०-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.   अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना  प्रशासनाला देण्यात आल्या. ००००

MB NEWS-नांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणार:प्रवाशांनी नोंद घ्यावी

इमेज
  नांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणार: प्रवाशांनी नोंद घ्यावी आज दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणा आहे.याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.         आज दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटेल.प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत चे प्रसिद्धीपत्रक रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी जारी केले आहे.

MB NEWS-अबब..! १० कोटीची म्हैस; रोज खाते ३० किलो हिरवा चारा

इमेज
  अबब..! १० कोटीची म्हैस; रोज खाते ३० किलो हिरवा चारा   हरियाणा मेरठ येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात तीन दिवसीय अखिल भारतीय किसान मेळाव्याच्या पहिल्या दिवशी 10 कोटी गोलू किमतीची म्हैस आकर्षणाचे केंद्र ठरली. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेले पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंह आपली म्हैस नावं गोलू टूला आणले.  गोलू या म्हैशीचे वय ४ वर्षे ६ महिने आहे. उंची सुमारे 5 फूट 6 इंच आणि लांबी 14 फूट आहे. त्याचे वजन 15 क्विंटल आहे. नरेंद्र सिंह यांनी सांगितले की त्यांच्या म्हशीचे नाव गोलू टू आहे. कारण त्यांच्या आजोबांचे नाव गोलू वन होते. ते आजोबा गोलू वन पेक्षा अधिक वैभवशाली होते. म्हणून त्यांनी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावर ठेवले. तसेच त्यांची म्हैस मुर्रा जातीची आहे. गोलू ते म्हशीचे वजन 15 क्विंटल म्हणजेच 1500 किलो आहे आणि त्याचे वय 4 वर्षे 6 महिने आहे. नरेंद्र सिंह यांनी सांगितले की गोल  दररोज 30 किलो कोरडा हिरवा चारा, 7 किलो गहू आणि 50 ग्रॅम खनिज मिश्रण वापरतो. गोलू 2 चा रोजचा खर्च सुमारे 1000 रुपये आहे. गोलू 2 च्या शेणांतून त्यांना भरपूर कमाई होत आहे. नरेंद्र य

MB NEWS-शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे

इमेज
  शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन  सरसकट  विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे   मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे  मागणी! परळी वैजनाथ प्रतिनिधी बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. संपूर्ण पीक शेतकऱ्याचे नष्ट झाले शासनाने प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट पिक विमा लागू करावा तसेच तलाठी यांच्यामार्फत सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.     सध्या सुगीचे दिवस असून शेतकऱ्यांना मात्र आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झाले त्यामुळे शेतकरी हातबल झाला असून त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच परतीच्या पावसाने रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेले आहे.    

MB NEWS-शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा -कैलास नाईकवाडे पाटील

इमेज
  शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा - कैलास नाईकवाडे पाटील  परळी वै ( प्रतिनिधी ) तालुक्यांत परतीच्या पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत , परळी  तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये परतीच्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका तूर आदींचा समावेश आहे नु क सा न झाल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी परळी चे  शिवसंग्राम शहर अध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी केली आहे

MB NEWS-प्रभाग क्रमांक १३ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर:प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ

इमेज
  प्रभाग क्रमांक १३ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर:प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ  परळी (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या भागाचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या उपक्रमाचा शुभरंभ करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या शिबिराचा शेकडो महिला आणि मुलांना लाभ झाला. बुधवार दि.१९ रोजी शहरातील मानिकनगर, शिवाजीनगर भागात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात शेकडो महिलांची रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणीसह अनेक आरोग्य तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांची उपस्थिती होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ परिचारिका आर.आर.येमले, आशा सेविका सविता मैड, खाजाबी शेख, सुलताना तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.

MB NEWS-शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची डॉ.संतोष मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भेट

इमेज
  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची डॉ.संतोष मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भेट परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-   परळीतुन आपल्या सामाजिक कार्याची श्रीगणेशा करणार्या व सध्या राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणार्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे भेट दिली.यावेळी अंधारे यांचा सत्कार करण्यात आला.   आपल्या अभ्यासपूर्ण व आक्रमक भाषणामुळे महाराष्ट्रात चर्चेचा चेहरा बनलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सामाजिक व राजकिय कार्याची सुरुवात परळी येथुन झालेली आहे.दसरा मेळावा व प्रबोधन यात्रे तील भाषणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.मंगळवार दि.18 रोजी त्या परळीत आल्या असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष यांच्या डॉ.श्रीनाथ हॉस्पिटल येथे सुषमा अंधारे यांनी भेट दिली.डॉ.अजित केंद्रे,विश्वजित मुंडे,कृष्णा दौंड,ओमकेश फड आदींची उपस्थिती होती.

MB NEWS-महर्षी दयानंद व्यायाम शाळा आयोजित महिला आत्मरक्षा संरक्षण शिबिर व बाल संस्कार वर्गाचे उद्घाटन

इमेज
  महर्षी दयानंद व्यायाम शाळा आयोजित महिला आत्मरक्षा संरक्षण शिबिर व बाल संस्कार वर्गाचे  उद्घाटन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         दरवर्षीप्रमाणे याही वर्षी18 ऑक्टोंबर 2022 ते 3 नोवेंबर 2022 या कालावधीमध्ये, 8 वर्षे ते 21वर्षे वयोगटातील मुला मुलींचे आत्मरक्षा व्यायाम शिबिर तथा संस्कार वर्ग सुरू करण्यात आले.         या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर  जुगलकिशोर लोहिया,. देविदासराव कावरे सर , प्रशांत कुमार  शास्त्री , जयपाल लाहोटी , सुभाष नाणेकर सर, गोवर्धन चाटे सर , शिवशंकर कराड सर ,  अतुल दुबे आदी मान्यवर उपस्थित उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जुगलकिशोर लोहिया यांनी आपल्या भाषणांमधून मुलांना आरोग्याचे धडे दिले व आत्मरक्षा शिबिराचे महत्त्व विशद केले तसेच बुद्धीच्या विकासाप्रमाणेच शारीरिक दृष्टिकोनातून आपले शरीर कशा पद्धतीने मजबूत करता येईल केले जाईल हे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींना व आलेल्या पालकांना देखील पटवून दिले.आत्मरक्षा स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर हे श्री डॉ.जगदीश कावरे सर यांच्या नियोजनबद्ध पार पडत आहे. त्याप्रसंगी महिला तसेच मुली यांच्या सा

MB NEWS-नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर

इमेज
  नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर बीड- कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या तोडणीनंतर चार पैसे हातात येतील अन दिवाळी जोरात साजरी होईल या बळीराजाच्या आशेवर सततच्या पावसाने पाणी फेरलं अन बळीराजा कोलमडून पडला.या शेतकऱ्याला थेट बांधावर जात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आधार दिला.नुकसानभरपाई निश्चित मिळेल,काळजी करू नका अस म्हणत केंद्रेकर यांनी गेवराई, बीड,आष्टी,पाटोदा या भागातील शेतकऱ्यांना आधार दिला. औरंगाबाद चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत गेवराईत रस्त्यावरील काही शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले, त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकर्‍यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे उपस्थित शेतकर्‍यांना केंद्रेकरांनी आश्वासीत केले बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडून शेतातील पिके

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले ! सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची  मागणी पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या  पिकांची केली पाहणी बीड । दिनांक १९। परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे, अशा संकटात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. तालुक्यातील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची आज पाहणी करून पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना मदतीचा विश्वास दिला.    जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी आज मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील जाधववाडी शिवारात शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले असून पिके पूर्णपणे उध्वस

MB NEWS-परळी वैजनाथ : निराधारांची दिवाळी होणार आनंदात: दोन दिवसांत अनुदान वाटप करण्याच्या तहसीलदारांच्या सक्त सुचना

इमेज
  परळी वैजनाथ : निराधारांची दिवाळी होणार आनंदात: दोन दिवसांत अनुदान वाटप करण्याच्या तहसीलदारांच्या सक्त सुचना परळी वैजनाथ...      संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर- 2022 चे अनुदान दोन दिवसांत वाटप करावे अशा सक्त सुचना परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे निराधारांची दिवाळी होणार आनंदात होणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी संख्या 5013 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर- 2022 चे अनुदान रुपये 3000/- तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी संख्या 12282 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर-2022 चे अनुदान रुपये 3000/- तसेच दि. 27/12/2021 च्या बैठकीमध्ये मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी संख्या 439 लाभार्थीना प्रत्येकी 9000/- तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दि.27/12/2021 रोजी बैठकीमध्ये मंजूर झालेल्या लाभार्थी संख्या 1023 लाभार्थीना प्रत्येकी 9000/- अनुदान बँकनिहाय वाटप करण्यात आले

MB NEWS-धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र*

इमेज
  ग्रामीण - दुर्गम भागातील शाळेत एक विद्यार्थी शिक्षण घेत असेल तरीही ती शाळा बंद करणे म्हणजे त्याचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणे - धनंजय मुंडे * कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र* *ऊसतोड कामगारांच्या आमच्या बीड जिल्ह्यात शिक्षणाच्या अधिक सोयी निर्माण करायची गरज, त्यात आहेत त्या शाळा बंद करणे अन्यायकारक - धनंजय मुंडे *शाळा बंद केल्यास अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे काय? शिक्षण बंद पडल्याने लेकरांना ऊस तोडणीला जावे लागल्यास जबाबदार कोण? मुंडेंच्या पत्रातून सरकारला सवाल* मुंबई (दि. 19) - राज्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतची कार्यवाही देखील सुरू केल्याची चर्चा आहे. याचा फटका राज्यातील सुमारे 14 हजार शाळांना बसणार असून बीड जिल्ह्यातील सुमारे 533 शाळा या निर्णयामुळे बंद होणार आहेत. बीड जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत, त्यामध्ये ऊसतोड कामगार, शेतमजूर, शेतकरी, हातावर पोट असलेले आर्थिक दुर्बल कुटुंब

MB NEWS-सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकली ; समस्यांचा केला जागेवरच निपटारा*

इमेज
 पंकजाताई मुंडेंचा बीड शहरात जनता दरबार :समस्यांचा केला  जागेवरच निपटारा सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी  ऐकली ; समस्यांचा केला  जागेवरच निपटारा बीड  ।दिनांक १९। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात घेतलेल्या जनता दरबारात शहर व विविध तालुक्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी  मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांच्या समस्या ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा केला.     पंकजाताई मुंडे आज बीड दौऱ्यावर आल्या होत्या. सकाळी त्यांनी भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी जनता दरबार घेतला. बीडसह आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई आदी तालुक्यातील नागरिक आपल्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक   समस्या घेऊन आले होते. या सर्वांची गाऱ्हाणी ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा निपटारा जागेवरच केला. काही संघटनांनी आपल्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. पंकजाताईंनी घेतलेल्या या जनता दरबारात तातडीने समस्या मार्ग

MB NEWS-काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड

इमेज
  काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शशी थरूर यांचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले असून ते काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.17 ऑक्टोबरला झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते. यातील 416 मते बाद झाली होती. खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीचा निकाल दुपारी 4 पर्यंत जाहीर करण्यात येईल असं सांगितलं जात होतं मात्र हा निकाल दुपारी दीडच्या सुमारासच स्पष्ट झाला. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शशी थरुर यांच्या गटाचे सलमान सोज यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. सोज यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मतदानात गडबड झाल्याचा सोज यांनी आरोप केला होता आणि उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध ठर

MB NEWS-परळी शहर पोलिसांची अवैध देशी दारु विक्रीवर कारवाई

इमेज
  परळी शहर पोलिसांची अवैध देशी दारु विक्रीवर कारवाई  परळी (प्रतिनीधी)  परळी शहर पोलिसांनी आज बुधवारी (दि.19) सकाळी बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात  छापे टाकत देशी दारुची अवैधपणे विक्री करणार्या तिघांना पकडले.त्यांच्याकडुन 7274 रुपयांची देशी दारु जप्त केली.  परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर केंद्रे,हरिभाऊ घुमरे,गोविंद भताने,श्रीकांत राठोड,अशोक शिंदे,सिध्दार्थ गोरे आदींनी गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरातील तीन जणांकडून विक्रीस ठेवलेली 2170 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.

MB NEWS-■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने

इमेज
  ■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने ◆ दिवाळी पूर्वी शासन व प्रशासनास दिला इशारा बीड/परळी : प्रतिनिधी सैंपल सर्वे'द्वारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिकविमा मंजूर करून तो वितरित करावा व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन पुन्हा एकदा किसान सभेचे लाल वादळ दिवाळी सणापूर्वी जिल्हाधिकारी कचेरीवर धडकले.या निदर्शने आंदोलनात जिल्ह्याभरातुन मोठ्या संख्येने शेतकरी,शेतकरी पुत्र,तरुण सहभागी झाले होते.यावेळी संतप्त शेतकरी पुत्रांनी भ्रष्ट पीक विमा कंपनी व कंपनी धार्जिनी सरकारचा प्रतिकात्म पुतळ्याचे दहन केले. गतवर्षी विमा प्रश्नी किसान सभेने शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी केली होती आजच्या या निदर्शने आंदोलनाने गतवर्षीचा प्रश्न आणखी सुटला नसल्याने हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून,जुलै मधील अतिवृष्टी, ऑगस्ट मधील 21 दिवसापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड आणि 11 ऑक्टोबर पासून बीड जिल्ह्यातील विविध महसूल मंडळात परतीच्या पावसाची अतिवृष्टी होत आहे. आकाशातील

MB NEWS-सौदागर कांदे शिक्षण महर्षी राज्यस्तरीय पुरस्कारासाने सन्मानित

इमेज
  सौदागर कांदे  शिक्षण महर्षी राज्यस्तरीय पुरस्कारासाने सन्मानित परळी (प्रतिनिधी. )   बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांना मैत्रा फाउंडेशन बीडच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण महर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सौदागर कांदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.     बीड येथील सामाजिक न्याय भावनात दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग बीड तसेच उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, महिला तक्रार विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, वन विभागाच्या ससाने मॅडम, शिक्षक नेते राजेंद्र खेडकर मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ल. वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.       सौदागर कांदे हे परळी तालुक्यातील दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे  एक उपक्रमशील तसेच विद्य

MB NEWS-मराठवाडातील विभागीय ओबीसी काँग्रेसच्या बीड येथील मंथन शिबिरात मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणार . - वसंत मुंडे

इमेज
मराठवाडातील विभागीय ओबीसी काँग्रेसच्या बीड येथील मंथन शिबिरात मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणार . -  वसंत मुंडे             मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत बीड येथे ओबीसी काँग्रेसचा विभागीय मंथन शिबिराद्वारे ८ आक्टोंबर २०२२ ला विविध प्रकारचे अकरा ठराव मंजूर केलेले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील विभागीय स्तरीय मंथन शिबिर ओबीसीच्या विविध विषयावर मोर्चे, हल्लाबोल, भारत जोडो अभियान,महंगाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेल गॅसची भाव वाढ ,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोरगरीब जनतेचे प्रश्न घेऊन ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात मोर्चे काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला आसुन देशातील सरकारी कंपन्या विकून देश चालवला जात आहे. महाराष्ट्रातील ईडी सरकार गुजरात साठी काम करीत आहे. लोकशाहीचे चारी स्तंभ केंद्र सरकारच्या हाती असून त्याचा गैरवापर केला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी , सर्व सामान्य जनतेने भारत जोडा अभियान