पोस्ट्स

स्थानक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद गाडीच्या वेळापत्रकात काहीसा बदल

इमेज
  ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद  गाडीच्या वेळा पत्रकात काहीसा बदल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या औरंगाबाद-हैद्राबाद या रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.      दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या  दि 12 एप्रिल च्या पत्रकान्वये ट्रॅफिक ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक  दि 13 ते 30 एप्रिल या कालावधीत चिकलठाणा औरंगाबाद विभाग - नांदेड विभागा दरम्यान प्रत्येक एक दिवस आड म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेसची वेळ 2 तास 40 मिनिट उशीरा होणार आहे. सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी ही रेल्वे गाडी औरंगाबाद या रेल्वे स्थानकावरून 18.55 वा सुटणार आहे.या रेल्वे गाडीची नियोजित प्रस्थान होण्याची वेळ 16.15 वा आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी याबाबत माहिती दिली आहे.

MB NEWS-परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह

इमेज
  परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            येथील रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह  आज( दि. २५) शुक्रवारी आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटली असुन मयत पानगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.        रेल्वे स्थानक परिसरात बाहेरच्या बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग लोहार, राहणार पानगाव, जि. लातूर (वय अंदाजे 55 वर्षे) अशी मयत व्यक्तीची ओळख  पटली आहे. या इसमाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस  माहिती घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे. मृतदेहाची ओळख पटल्याने संबंधितांच्या नातेवाईकांना पोलीस प्रशासनाने संपर्क करून कळवले आहे. याबाबतचा अधिक तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत. ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा.....