MB NEWS: video-अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश!

अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश! 11 जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने शार्प शूटर द्वारा केला खात्मा करमाळ्यातील वांगी नं.4 रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीत ठार मारले. आष्टी...... बीड - आष्टी, अहमदनगर, सोलापूर, जालना औरंगाबाद जिल्ह्यात 11 जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी ( दि .१८ ) यश आले आहे . करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला . आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांची शिकार केली होती.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती. काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती .परवा सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला.वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनी च्या काठ...