MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले

ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नाथ्रा येथे आज आ.धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला मात्र पंकजाताई व खा.डॉ.प्रीतमताई मतदानाला काही अपरिहार्य कारणास्तव पोहचू शकल्या नाही.त्यामुळे मुंडे भगिनींचे मतदान राहिले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. नाथरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच अभय मुंडे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुक झाली. राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या ना...