दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

दुःखद वार्ता: संतोष फड यांचे निधन परळी (प्रतिनिधी):- शहरातील कपड्याचे व्यापारी व कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले संतोष गणपतराव फड वय (35) वर्ष यांचे दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ, दोन मुली व मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा विधी कनेरवाडी येथील स्मशानभूमीत होणार आहे. फड परिवारावर कोसळलेल्या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.