MB NEWS-राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर परळी वै. (प्रतिनिधी) : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे (दि.२४) मार्च बुधवार रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून (ता.२४) मार्च रोजी मौजे ब्रह्मवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्त तपासणी विविध आजारांवर मोफत औषध उपचार देण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्य विभागातील डॉ.शुभांगी म...