MB NEWS: परभणी,जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोनाबाधित, चार व्यक्तीचा मृत्यू...

जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोनाबाधित, चार व्यक्तीचा मृत्यू... परभणी दि. 3 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि.तीन) 103 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. चार कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 61 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 626 आहेत. आजपर्यंत 238 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 618 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 754 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी चार कोरोनाबाधित पुरूषांचा मृत्यू झाला.