MB NEWS:आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार

सिरसाळ्याच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेत कॅशियरने केला 19 लाखांचा अपहार आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार सिरसाळा : येथील अंबेजोगाई पीपल्स बँक शाखेत कॅशयीर पदावर असणारे सुनील अशोक देशमुख यांनी १९ लांखाचा अपहार केल्याची तक्रार शाखा व्यवस्थापकांनी सिरसाळा पोलीसात दिली आहे. दिनांक ९ मार्च रोजी कॅशियर सुनिल देशमुख सायंकाळ पासुन सिरसाळा येथून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांचे बंधु प्रशांत अशोक देशमुख यांनी दिनांक १० मार्च रोजी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे येवून दिली. तक्रारीत प्रशांत देशमुख म्हणाले कि, माझा भाऊ सुनील देशमुख यांने मोबाईल वर मेसेज केला की बँकेतील कर्मचारी पैशांचा घोटाळा करत आहेत व तो सर्व घोटाळा माझ्या अंगलट येणार असल्याने मी आत्महत्या करत आहे. दरम्यान कॅशियर देशमुख बेपत्ता झाल्याचे समजल्याने बँक मॅनेजर यांनी बँकेत रक्कम तपासली असता १९ लाख रुपये तिजोरीतून गायब असल्याचे निदर्शनास आले. मॅनेजर इंगळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे कॅशयर सुनील देशमुख यांच्या विरोधात अपहार प्रकरणी तक्रार दिली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्य...