MB NEWS-श्रीमती जमुनाबाई काबरा यांचे निधन

श्रीमती जमुनाबाई काबरा यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... येथील सुभाष चौक भागातील रहिवासी श्रीमती जमुनाबाई रामगोपाल काबरा यांचे वृद्धापकाळाने आज दि.१६ रोजी दुपारी निधन झाले. मृत्युसमयी त्या 88 वर्षे वयाच्या होत्या. जमुनाबाई काबरा या अतिशय मनमिळावू धार्मिक संयमी व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. परळी शहरातील सर्वपरिचित व्यवसायिक जयप्रकाश, डॉ. रमेशचंद्र, विजयकुमार काबरा यांच्या त्या मातोश्री होत, तर व्यावसायिक मनोज, मुकेश, आशिष, प्रवीण, ईश्वर, डॉ. दर्शन काबरा यांच्या त्या आजी होत. त्यांच्या निधनाने काबरा परिवाराचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या निधनाने काबरा कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.