पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS- 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकांचे प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान वेबसाईटचे उद्घाटन

इमेज
 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकाचे  प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन सोलापुर (प्रतिनिधी) महेश कोटिवाले लिखित महिमा श्री वडवालसिध्द नागनाथांचा या पुस्तकांचे प्रकाशन  आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन संपन्नसंतवाॾ:मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तामहाराज आंधळे यांचे हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत दस-याच्या शुभमुहूर्तावर श्रीश्रेत्र वडवाल येथे संपन्न झाले. श्रीनागनाथ देवस्थान पंचकमेटी यांनी या नेत्रदिपक सोहळयाचे आयोजन केले होते. या  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड दत्ता महाराज आंधळे म्हणाले की,नागेश संप्रदाय हा सर्वसमावेशक आणि समन्वयक असलेला संप्रदाय असून याचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.नागनाथ देवस्थान पंचकमेटी स्तुत्य उपक्रम आणि समाज उपयोगी योजना राबवित असल्याबाबत पंचकमेटी चे कौतुक केले.याकार्यक्रमास खर्गेमहाराज,पोपट शिवपुजे महाराज,आकाश शिवपुजे महाराज,राजेंद्रबुवाखर्गे महाराज, पोलिस निरिक्षक आकाश सायकर, नागनाथ देवस्थान पंचकमेटी अध्यक्ष श्री श्रीकांत शिवपुजे,लेखक महेश कोटिवाले,ॲड हिंदुराव देशमुख,आण्णासाहेब देशमुख , पोलिस पाटिल दादा काकडे,

MB NEWS-*स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता*

इमेज
  *स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता* *ह.भ.प. समाधान महाराज केजकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता* *स्व.पंडित अण्णांच्या स्मृतींनी धनंजय मुंडे भावुक* परळी (दि. 17) ---- : बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी महर्षी स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या 5 व्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे परिवाराच्या वतीने मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या श्री वाणीतून सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची आज सांगता झाली.  या सप्ताहाच्या सांगतेवेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केजकर) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. बालयोगी हरिहर महाराजांच्या वाणीतून भागवत कथेचा शेवट व त्यानंतर संगीत विशारद ह.भ.प. शर्मा महाराज यांचे संगीतमय सुश्राव्य कीर्तन यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह मुंडे कुटुंबीय, नाथरा व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांनी स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाथरा निवासस्थान येथील स्मृतीशिल्प त

MB NEWS-राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन

इमेज
  राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन परळी (प्रतिनिधी-) राधा-मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने कोजागिरी पोर्णीमेच्या दिवशी दूधातून घेण्यासाठीचे दमा आजारावरील मोफत औषधींचे वितरण करण्यात येत आहे. बीड येथील आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री (बाबूजी) यांनी सदरचे औषध तयार केले असून मागील अनेक वर्षापासून त्याचे वितरण करण्यात येते. दमा आजारावर अत्यंत प्रभावशाली औषध त्यांनी तयार केले असून कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी परळीतील दमा रुग्णांसाठी औषधी दिली जाणार असल्याचे राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. दमा आजाराने अनेकांना विविध प्रकारचे औषध घेऊनसुद्धा गुण येत नसल्याची तक्रार असते. परंतु बीड येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांनी तयार केलेली औषधी मागील 75 वर्षापासून दिली जात असून त्याचा दमा आजारावर योग्य उपार झाल्याचे अनेकांनी सांगीतलेले आहे. सदरील औैषधी उपयुक्त असल्याने बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मागील अनेक वर्षापासून को

MB NEWS- *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_*

इमेज
 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_* प्रतिनिधी।परळी वैजनाथ दि.17- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती. 1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम

MB NEWS-सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन प्रकाश गित्ते यांना पितृशोक

इमेज
  सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन प्रकाश गित्ते यांना पितृशोक परळी वै प्रतिनिधी  एस.टी.महामंडळाचे सेवानिवृत कर्मचारी उत्तमराव महिपती गित्ते यांचे एकादशी निमित्ताने पंढरपुर येथे देव दर्शनासाठी गेले असता आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास -हदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.मृत्यू समयी त्याचे वय 70 वर्ष होते. उत्तमराव महिपती गित्ते हे दर महिण्याला पंढरपुरची वारी करत असत. काल एकादशी निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी पोहचले असता त्यांना अचानक -हदयविकाराचा मोठा धक्का बसला आणी त्यातच त्यांची प्राणजोत माळवली.एस.टी महामंडळात त्यांनी मॕकॕनिक म्हणुन सेवा दिली आहे.अतिषय धार्मिक,सांप्रादायीक आणी सुस्वभावी व्यक्ती म्हणुन सर्वत्र सुपरिचित होते.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यनाथ बॕकेच्या वडवणी शाखेचे कर्मचारी प्रकाश गित्ते यांचे ते वडिल होत.वैकुंठवासी उत्तमराव महिपती गित्ते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,एक मुलगी सुना,नातवंडं असा भरगच्च परिवार आहे.