पोस्ट्स

ऑक्टोबर २५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

इमेज
  महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी  परळी वैजनाथ दि.31 (प्रतिनिधी) परळी परिसरात महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शनिवारी (ता.31) लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची ३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांनी आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी या दोन्ही महान हस्तींना मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.व्ही.गुट्टे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.       भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांमध्ये खंडित असलेल्या भारताला एकसंध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण करण्याक

MB NEWS:गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी

इमेज
  गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी  प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी साजरी परळी (प्रतिनीधी) प्रभाग क्र.पाच चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले संपर्क कार्यालय हे नागरीकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांनी केले.प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम व शितल चांदण्यात दुध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. संत सावतामाळी मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर समोर प्रभाग क्र.5 चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे काल दि.30 ऑक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकूमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष आय्युब पठाण,माजी सभापती विजय भोयटे,जनक्रांती संघटनेचे नेते सचिन लगड,पञकार धिरज जंगले, अनंत कुलकर्णी,रायुकॉचे रामदास कराड, बळीराम नागरगोजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

MB NEWS:बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

इमेज
  बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली *बापूंच्या आठवणींना मुंडेंनी दिला उजाळा* मुंबई (दि. ३१) ---- : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.  ना. मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशीम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे

MB NEWS:सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

इमेज
  सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई  मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई दि. ३१ ---- २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.   सुरक्षा मंत्रालयांतर्गत कार्यरत सिव्हील स्कूल सोसायटी देशातील निवासी सैनिकी शाळा चालवत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी  काल ट्विट करत ही माहिती दिली ते म्हणाले की,सन २०२१-२२ पासून सैनिक शाळांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाणार आहे. १३ ऑक्टोबरला एक परिपत्रक देशातील सर्व सैनिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. या परिपत्रकात नमूद केले आहे की, सैनिक शाळांमधील ६७ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर ७.५ टक्के जागा अनु

MB NEWS:संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला- पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
  संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला  पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना मुंबई दि. ३१ ----- आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला आहे, त्यांचे विचार व सर्व सामान्य लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरादेवी संस्थानचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब दरवर्षी पोहरादेवीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असत, तीच परंपरा मी पुढे जपली. त्यांचे विचार आणि तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील, त्यांच्या निधनाने देश  एका महान तपस्वीला मुकला आहे अशा शब्दांत आपल्या शोक भावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  ••••

MB NEWS:परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

इमेज
परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश बीड (दि. ३०) ---- : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई , केज व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याने धनंजय मुंडे यांनी तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत.  नुकताच ना मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द ना. मुंडेंनी राज्य शासनाच्या वतीने दिला होता.  राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेज मधून शे

MB NEWS:बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ* *--जिल्हाधिकारी राहूल रेखावार

इमेज
  बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ --जिल्हाधिकारी राहूल रेखावार  बीड, दि,३० :- (जि.मा.का.) राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामूळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.      जिल्ह्यात यापूर्वी सदर कलमान्वये दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत त्यात वाढ होऊन दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुण खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकार

MB NEWS:कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी करावी ―प्रा विजय मुंडे

इमेज
  कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी करावी ―प्रा विजय मुंडे परळी/प्रतिनिधी परळी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परळी येथे आपली कापूस खरेदीची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केले आहे.       यावर्षी कापूस या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केल्यावर  भारतीय कपास  लि  व  राज्य पणन महासंघ द्वारे हमीभावाने शेतकऱ्यांचा  कापूस खरेदी केला जातो त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपली ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.    ऑनलाईन नोंदणीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे ऑनलाईन करावीत त्यामध्ये कापूस विक्री नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे   कागदपत्रे आहेत  त्यात (1)सातबारा (२)पिक पेरा (3)एक फोटो (4)आधार कार्डची झेरॉक्स व (5) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जमा करावीत व आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रा. विजय मुंडे यांनी के

MB NEWS:वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा मान्यवरांकडून सत्कार

इमेज
  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा मान्यवरांकडून सत्कार परळी : वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश निर्मळे. विजय वाकेकर ,संदीप लाहोटी,धरमचंद बडेरा, विकी भाटिया ,विकी सामत ,माऊली कांदे, रामेश्वर काळे , यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .अनिल तांदळे यांचां वाढदिवसानिमित्त विनोद सामत यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

MB NEWS: *कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी*

इमेज
  *कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी* मुबई : राज्यात अनलॉकच्या विविध टप्प्यातंर्गत टप्प्या-टप्प्याने सर्व काही पूर्ववत करण्यात येत आहे. यानुसार आता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थामधील ऑनलाइन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकतंच याबाबतच परिपत्रक शासनाने जारी केलं आहे. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यात मिशिन बिगेन अगेन अतंर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर मिशिन बिगेन अगेन या कार्यक्रमातंर्गत राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यास सहमती दिली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी म

MB NEWS:राज्यातील शाळा सुरू होण्याचे शिक्षण विभागाचे संकेत

इमेज
  राज्यातील शाळा सुरू होण्याचे शिक्षण विभागाचे  संकेत मुंबई : राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. सुमारे ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याबरोबरच शाळा २ ते ३ वेळेस निर्जंतुकीकरण, पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश तसेच अध्यापन साहित्य व संगणकांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देत राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नाही. यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात यावेत. हे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता आल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. आता प्रवासाची सार्वजन

MB NEWS:सामान्य नागरिकांना आनंदाची वार्ता: यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द

इमेज
  सामान्य नागरिकांना आनंदाची वार्ता: यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द  मंत्री अॅड. अनिल परब यांची माहिती मुंबई.....  दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा covid-19 च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.    ते पुढे म्हणाले की राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा सणासुदीचा काळ सलग सुट्ट्या सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहेत त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बस सेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे मात्र यंदा covid-19 च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट

MB NEWS:*💐गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन*

इमेज
  *💐गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन*  -----------------------------------    गांधीनगर - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. 92 वर्षीय केशुभाई यांनी 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती.  केशुभाई पटेल यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर ते कोरोनामधून ठणठणीत बरेही झाले होते. केशुभाई यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

MB NEWS: *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २९ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....*

इमेज
 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २९ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात ७० रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ७५३ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ ३ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात ६८३ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड २०, अंबाजोगाई १०, आष्टी ७, धारूर १, गेवराई ७, केज २, माजलगाव ७, परळी ३ , पाटोदा १, शिरूर २ तर वडवणी १०*

MB NEWS: *भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांला तात्काळ अटक करा― प्रा.टी. पी.मुंडे*

इमेज
  *भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांला तात्काळ अटक करा― प्रा.टी. पी.मुंडे* परळी /प्रतिनिधी बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील पोलिस स्टेशन जवळ असलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी  प्रा. टी.पी. मुंडे (सर )यांनी केलीे.   काल बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहाटे चार ते पाच या सुमारास समाजकंटकांकडून भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोलिस स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याची विटंबना केली या घटनेचे तीव्र पडसाद बरदापुर व परिसरात उमटले. आंबेडकरांना मानणाऱ्या नागरिकांनी व नेत्यांनी रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन व सरकार व पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली या घटनेमुळे आंबेडकरांना मानणाऱ्यात असंतोष पसरला आहे.     बर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये समाजकंटका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र अजूनही समाजकंटकांचा शोध पोलिसांना लागलेला नाही त्वरित समाजकंटकांचा शोध न लागल्यास याचा भयंकर प

MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्...दि.२८/१०/२०२०.

इमेज
  *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात ८९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १०८४ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात ९९५ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड २३, अंबाजोगाई ११, आष्टी ११, धारूर ३, गेवराई ७, केज ६, माजलगाव ३, परळी ६ , पाटोदा ४, शिरूर १० तर वडवणी ५*

MB NEWS: *स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार*

इमेज
 *स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार* *खा. शरदचंद्रजी पवारांसमोर मंत्री धनंजय मुंडे, समाज कल्याण आयुक्तांनी केले सादरीकरण*   *नोव्हेंबर अखेर महामंडळ ची नोंदणी करून डिसेंबर पासून महामंडळाचे कामकाज पुर्ण क्षमतेने सूरू करण्याचे खासदार श्री शरद पवार यांचे निर्देश.*   पुणे (दि. २७) ---- : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी दिली. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या /प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाला बळकटी देण्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजना याबाबत सविस्तर सादरी

MB NEWS:मौलाना आजाद अल्पसंख्यांक च्या सर्व योजनांची अंमलबजावणी तत्काळ करा -सय्यद जमील अध्यक्ष

इमेज
  मौलाना आजाद अल्पसंख्यांक च्या सर्व योजनांची अंमलबजावणी तत्काळ करा -सय्यद जमील अध्यक्ष परळी वै(प्रतिनिधी) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब गरजू लघु उद्योग व्यवसायासाठी विविध योजना कर्ज स्वरूपात राबविले मात्र मागील काही वर्षापासून महामंडळाच्या योजना ची अंमलबजावणी होत नसल्याने अल्पसंख्यांक मागासलेला आहे याची दखल घेऊन महामंडळाच्या प्रलंबित योजना त्वरित लागू करण्याची मागणी परळी येथील सय्यद जमील यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री तसेच अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे केली आहे  दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की  राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना, व्यवसाय परीक्षण व अन्य योजना राबविण्यासाठी सन २००० मध्ये मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब व गरजूंना लघुउद्योग व व्यवसाय करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाती.  प

MB NEWS:मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ कशासाठी? कालमर्यादा ठरवून सोक्षमोक्ष लावा -अमित घाडगे

इमेज
  मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ कशासाठी? कालमर्यादा ठरवून सोक्षमोक्ष लावा -अमित घाडगे  परळी l प्रतिनिधी मराठा आरक्षण तथा शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर परळीत 8 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकळ मराठा समाजाच्या वतीने रोखठोक आंदोलन करण्यात आले होते. सरकार राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यास तयार झाल्यामुळे या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र या गोष्टीची कालमर्यादा ठरवून सरकारने सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. परळीत सुरु करण्यात आलेले आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलनाचा निर्णय कोर्टात लवकर व्हावा यासाठी राज्य सरकारने सक्षम पाऊले उचलावीत व तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा परळीचे आंदोलन पुन्हा सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यावश्यक मुद्दा आहे. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे हजारो मुलांचे नुकसान होत आहे. आरक्षण मिळाले

MB NEWS:माणिकराव पाळवदे यांचे निधन प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोक

इमेज
  माणिकराव पाळवदे यांचे निधन  प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोक  परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-   परळी तालुक्यातील जेष्ठ राजकिय सामाजीक व्यक्ती हेळंब सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे आज दि.27 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले.वैद्यनाथ महाविद्यालयातील प्रा.नारायण पाळवदे, प्रा.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे यांचे ते वडील होते.  परळी तालुक्यातील हेळंब येथील रहिवासी माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणुन ओळखले जायचे गावच्या विकासात,ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होवुन हेळंब गावचा विकास साधला. उपसरपंच, सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन व अनेक वर्षे संचालक म्हणुन काम करताना असंख्य शेतकर्यांच्या समस्या सोडवल्या वयाच्या 92 व्या वर्षी आज मंगळवार दि.27 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तीन मुले व दोन मुली सुना,नातवंडे पणतु असा परिवार असुन परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांचे ते आजोबा होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि.27 रोजी हेळंब येथे दुपारी 3 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS :सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

इमेज
  सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार (Government of India) पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty) वाढवण्याच्या तयारीत आहे. 3 ते 6 रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरकारने मे महिन्याच्या दरम्यान, पेट्रोलवर 10 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली होती. मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात असल्याने, क्रूड स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसून, त्यांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. पेट्रोलवर लागणार टॅक्स आणि कमिशन - एक्स फॅक्टरी किंमत - 25.32 रुपये भाडे आणि इतर खर्च - 0.36 रुपये  अर्थव्यवस्थेला झालेल्या

MB NEWS: राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात; हवामान विभागाची माहिती

इमेज
 *🌧️राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात; हवामान विभागाची माहिती*   -----------------------------------  यंदा पंधरा दिवस लांबलेल्या आणि जाता जाता देशभरात थैमान घालणाऱ्या परतीच्या पावसाला राज्यातून आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी ही माहिती दिली. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटलं की, "परतीच्या पावसाला महाराष्ट्रातून आजपासून सुरुवात झाली आहे. सूर्यप्रकाश आणि काहीशा ढगाळ वातावरणात विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागातून आणि उत्तर कोकणातून आजपासून पावसाने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.